श्री मातामठ तालीम समोरील डिप्पी स्थलांतरित करण्या बाबत आज MPCL कंपनीला निवेदन

श्री मातामठ तालीम समोरील डिप्पी स्थलांतरित करण्या बाबत आज MPCL कंपनीला निवेदन

मालेगांव :- यावर्षी दि. २७.८.२०२५ ते दि.६.९.२०२५ या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. तरी आमचे मातामठ तालीसमोर आपले विभागाची डी.पी. असून सदर डी.पी. जवळ परीसरातील रहिवासी त्यांचे घरातील घाणकचरा, मांसाचे अवशेष व इतर कचरा आणून टाकतात. त्यामुळे परीसरात असह्य वास पसरुन डास व माशांचा त्रास होतो. आमचे तालीम व देवी मंदिर तसेच मंदिरास लागून असलेले मशिदीचे समोर सदर गैरप्रकार होत असल्याने भाविकांच्या धार्मिक भावना दुखावतात. त्यासाठी सदर गैरसोयीची असणारी डी. पी. स्थलांतरीत करणे अत्यावश्यक आहे. तरी सदर डी.पी. अन्यत्र स्थलांतरीत करणेत यावी ही विनंती.
   तसेच श्री गणेश विसर्जन मिरवणूकीचा पारंपरीक मार्ग तसेच आमचे तालीमसमोर वीजेच्या लटकत्या तारादेखील वर करणे आवश्यक आहे. अन्यथा एखादे वेळेस जीवित वा वित्तहानी होऊ शकते. तसे झाल्यास त्यास आपण जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी.
तरी डी.पी. स्थलांतरीत करणेचे काम तसेच वीजेच्या लटकत्या तारा उंच करणेचे काम दि.२०.८.२०२५ पावेतो करणेत यावे ही विनंती. अन्यथा नाइलाजाने आपले कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणेत येईल
    तालमीचे जेष्ट सुरेश नाना गायकवाड दिलीप नाना पवार मनीष आप्पा पाटील भरत पाटील यशवंत शिवदे अध्यक्ष शाम गवळी उपाध्यक्ष कमळाकर जाधव कार्याध्यक्ष कल्पेश गायकवाड विक्की पाटील करण भोसले शुभम कुलकर्णी 
रमेश गायकवाड,निखिल चौधरी,योगेश मिसर,नकुल गायकवाड उपस्थित होते..!

Comments