क्रूरतेचा कळस! नानावटी पेट्रोल पंपाजवळ धारधार शस्त्र, लाकडी दांडके अन् चेहऱ्यावर दगड मारून युवकाचा खात्मा; मालेगांवमधील घटनेने खळबळ...
क्रूरतेचा कळस! नानावटी पेट्रोल पंपाजवळ धारधार शस्त्र, लाकडी दांडके अन् चेहऱ्यावर दगड मारून युवकाचा खात्मा; मालेगांवमधील घटनेने खळबळ...
मालेगाव (Malegaon) शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नानावटी पेट्रोल पंपाजवळ काल (दि. 31 जुलै) रात्रीच्या सुमारास एका युवकाचा तीन अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण खून केला.नितीन अर्जुन निकम (वय अंदाजे 30), असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, तो मालेगाव महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन निकम हा नानावटी पेट्रोल पंपाजवळ उभा असताना तिघेजण दुचाकीवरून आले आणि त्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्र, लाकडी दांडके आणि दगडांनी हल्ला चढवला. हल्लेखोरांनी त्याच्या चेहऱ्यावर दगड घालून त्याला ठार मारलं. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.मागील आठवड्यात गोळीबार, आता निर्घृण खून
या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमॉर्टेम) पाठवण्यात आला आहे. दरम्यान, हल्ल्याचं नेमकं कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून तपास सुरु आहे. गेल्याच आठवड्यात मालेगावात गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर आता धारदार शस्त्रांचा वापर करून एका युवकाचा खून झाल्यामुळे शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
Comments
Post a Comment