शाह विद्यालयात स्वतंत्र भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा....
संगीत कवायत, साहसी खेळ, लेझीम नृत्य लक्षवेधी
मालेगाव शहरातील वर्धमान शिक्षण संस्था संचलित श्री रतिलाल वीरचंद शाह विद्यालयात स्वतंत्र भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त प्रकाश कांतिलाल शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थेचे विश्वस्त रमेश मुन्नालाल शाह, प्रकाश पन्नालाल शाह, उपाध्यक्ष परेश शाह, , सहसचिव गौतम प्रकाश शाह, गौतम रमेशचंद्र शाह, कोषाध्यक्ष पद्मेश मेहता, सदस्य अशोक शाह, नितीनकुमार शाह, सिद्धार्थ शाह, प्राचार्य मंगेश सूर्यवंशी, मुख्याध्यापक नितीन ठाकरे, पर्यवेक्षक स्मिता देशपांडे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष नेवीलकुमार तिवारी, राजश्री दुसाने, पुनम देवरे, पल्लवी देवरे, आशा दोरीक, संदीप बोरसे, धनंजय वैद्य, किरण सोनवणे, हरी गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
संगमेश्वर परिसरातून बँड पथक, लेझीम पथक, स्काऊट गाईड पथकासह रॅली काढण्यात आली. देशभक्तिपर घोषणांनी परिसर दणाणला. लेझीम नृत्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शालेय आवारात रॅली समारोप झाला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली देशभक्तिपर गीतांवरील कवायत, साहसी खेळ, लेझीम नृत्य सादरीकरण करण्यात आले. क्रीडा शिक्षक एस.आर.जोशी यांनी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संगीत शिक्षिका बी.एन.पोफळे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सारे जहाँ से अच्छा या देशभक्तिपर गीताचे समूह गायन सादरीकरण करण्यात आले. गेल्या शैक्षणिक वर्षातील शालेय कार्यक्रम उपक्रम यांच्या बातम्यांचे वृत्त विशेष या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रसिद्धी समिती प्रमुख टी.के.देसले, एन.के.गायकवाड, सुरेश पाटील यांनी यासाठी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी शिक्षकांनी व्यसनमुक्तीचा सामूहिक शपथ घेतली.
स्काऊट आणि गाईड पथकातील राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक एस.बी.जाधव यांनी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनन्या निकुंभ, सबुरी देसाई, मानसी सोनवणे, सेजल विश्वकर्मा, गुंजन चव्हाण, मृण्मयी सोनवणे या विद्यार्थ्यांची भाषणे झालीत. विद्यालयाची माजी विद्यार्थीनी श्रावणी गोकुळ कदम ही एअर होस्टेज झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात प्रकाश शाह यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.एल.फडके, बी.एन.पोफळे यांनी केले. सांस्कृतिक समिती प्रमुख बी.जी.निकम यांच्यासह विविध समितीचे प्रमुख सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
Comments
Post a Comment