हुतात्मा स्मारक टिळक नगर संगमेश्वर येथे दोन हजार स्क्वेअर फुट अभ्यासिकेच्या कामाचे भूमिपूजन मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते तहसीलदार विशाल सोनवणे, निखिल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न


हुतात्मा स्मारक टिळक नगर संगमेश्वर येथे दोन हजार  स्क्वेअर फुट अभ्यासिकेच्या कामाचे भूमिपूजन मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते तहसीलदार विशाल सोनवणे, निखिल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न


मालेगांव :-भारत स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या थोर क्रांतिवीरांना क्रांती दिनानिमित्त आदरांजली वाहून हुतात्मा स्मारक टिळक नगर संगमेश्वर येथे दोन हजार  स्क्वेअर फुट अभ्यासिकेच्या कामाचे भूमिपूजन मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते तहसीलदार विशाल सोनवणे, निखिल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 
अभ्यासिकेसाठी नाशिक पदवीधर मतदार संघातील विधान परिषद सदस्य आ. सत्यजित तांबे यांच्या निधीतून 75 लाख रुपये तसेच मनपा फंडातून 50 लाख रुपये हुतात्मा स्मारक परिसर सुशोभीकरण व  दुरुस्ती, अभ्यासिका साहित्य व उद्यान विकसित करण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. 
मालेगाव तालुक्यातील प्रतिकूल परिस्थितील अनेक विद्यार्थी या अभ्यासिकेत अभ्यास करून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात तसेच पोलीस व सैन्य दलात भरती झालेले आहे. अभ्यासिकेचा फार मोठा फायदा गरीब परिस्थितीतील विद्यार्थ्यांना होत असून हुतात्मा स्मारकातील जागा विद्यार्थ्यांना अपुरी पडत असल्यामुळे अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका व वातावरण निर्माण व्हावे याकामासाठी निखिल पवार सातत्याने पाठपुरावा करत होते त्यास मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांनी  विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक उत्तर अधिकारी संघटनेचे रघुनंदन सावकार, मोहन वैद्य, दिलीप वाणी, मनपा प्रभाग अधिकारी सचिन भामरे, अभियंता महेश गांगुर्डे, उद्यान अधीक्षक निलेश पाटील, भाजपा शहराध्यक्ष देवा पाटील, भरत पाटील, प्रवीण चौधरी, इंजि. जयेश आहिरे, राष्ट्रीय एकात्मता समितीचे उपाध्यक्ष केवळ हिरे, हरिप्रसाद गुप्ता, मधुकर केदारे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विजयालक्ष्मी अहिरे मॅडम, ॲड हिदायतुल्ला अन्सारी, ॲड नाविद आर्षद, मानद वन्यजीवरक्षक अमित खरे, महापारेषणचे इंजी. राहुल गवळी, सेवानिवृत्त उपनिरीक्षक बब्बू सय्यद, हरुण जिलेबीवाला, डी झेड पाटील, मनपा कर्मचारी संदीप कापडे, समाधान अहिरे,  पप्पू धीवरे, मुकेश कबीर, शांताराम मिस्तरी, तुषार पाटील, योगेश खैरनार, संदीप गवळी, अरबाज सय्यद, भिका गवळी, विशाल मंडलिक, राजेश मोरे, विशाल अहिरे, राहुल गवळी, जुबेर पिंजारी, सोमनाथ तागड, आकाश ठाकरे, चेतन मोहिते, अजय सोनवणे, रोहित तुतारे, दिनेश कुराडे आधी उपस्थित होते.

Comments