दोन्ही सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर अवजारे गुन्हा दाखल करून काळया यादीत टाकण्यात यावा.. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती सदस्यांची बैठक संपन्न...या ठेकेदारास पुन्हा केलेल्या रस्ताची दुरुस्ती व दंडात्मक कारवाई करणार - आयुक्त रवींद्र जाधव..
दोन्ही सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर अवजारे गुन्हा दाखल करून काळया यादीत टाकण्यात यावा..
आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती सदस्यांची बैठक संपन्न
त्या ठेकेदारास पुन्हा केलेल्या रस्ताची दुरुस्ती व दंडात्मक कारवाई करणार - आयुक्त रवींद्र जाधव..
आजोंद्या बाबा मंदिर भायगाव रोड ते भोसले पेट्रोल पंप नामपुर रोड मालेगाव कॅम्प व संकल्प हॉस्पिटल सटाणा रोड ते जैन स्थानक कलेक्टर पट्टा या रस्त्यांच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार होऊन निष्कृष्ट दर्जाचे कामे मार्गी लावण्यात आलेली आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला अल्पावधीतच खड्डे पडले तडे गेले व रस्ते जॉइंट वर दुभंगले आहेत. त्यावर लिपापोती करण्यासाठी डांबरी पॅच मारण्यात आले आहे. सिमेंट रस्ते बनवल्यावर दीर्घकाळ त्याला दुरुस्तीची गरज नसते त्याची मजबुती डांबरी रोड पेक्षा जास्त असल्यामुळे डांबरी रोडच्या चार पट खर्च करून सिमेंट रस्त्यांची निर्मिती केली जात आहे हा उद्देश असफल होऊन महापालिकेचा करोडो रुपयाचा निधी पाण्यात जात असल्याच्या निषेधार्थ आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या निखिल पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
आजोंद्या बाबा मंदिर ते नामपूर रोड रस्त्याच्या कामाच्या ठेकेदाराला काळया यादीत टाकण्यात आले असून सटाणा रोड ते जैन स्थानक रस्त्याच्या ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. ठेकेदाराने डांबरी स्पॅच मारून रस्ते दुरुस्ती करून दिली असल्याची माहिती शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी दिली.
त्यावर सिमेंटच्या रस्त्यावर हॉट मिक्स डांबरीकरण करणे हे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का ? ते कोणत्या आधारावर केले जाते ? त्याला शासनाने किंवा संशोधन संस्थांनी कशी मान्यता दिली आहे ? जर सिमेंट रस्त्यावर हॉट मिक्स डांबरीकरण तांत्रिकदृष्ट्या मान्य नसेल तर हे हॉट मिक्स डांबरीकरण का करण्यात आले ? हे करत असताना महानगरपालिकेच्या अभियंत्यांना विश्वासात घेतले होते का ? मनपा अभियंत्यांनी याला कोणत्या तांत्रिक आधारावर संमती दर्शवली ? सिमेंट रस्ते दीर्घकाळ टिकू शकत नसतील तर ते करण्याचा अट्टाहास का केला जात आहे ? सन्माननीय शिक्षण मंत्री नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांनी मालेगावच्या इतिहासात सन 2019 ते 25 हे वर्ष विकास कामांमुळे सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल असे वारंवार स्पष्ट केले होते. परंतु सन 2019 ते 25 हे वर्षात भ्रष्टाचार व निष्कृष्ट दर्जाच्या झालेल्या अनेक कामांमुळे नक्कीच सुवर्ण अक्षरात नोंदवले गेले आहे. याला जबाबदार कोण ? असे प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आले.
मालेगाव महानगरपालिकेतर्फे महत्त्वाचे रस्ते विकसित करत असताना त्यांच्या इस्टिमेट मध्ये तांत्रिकदृष्ट्या आवश्यक सर्व बाबींची पूर्तता होणे गरजेचे असून त्यानुसारच काम केले जाणे गरजेचे आहे. कोणताही रस्ता बनवत असताना पुढील काळातील वाहतुकीचे प्रमाण व लोड लक्षात घेऊनच तो केला जाईल अशी अभियंत्यांकडून अपेक्षा व्यक्त केली.
आयुक्त रवींद्र जाधव यांनी मालेगाव महानगरपालिकेतर्फे आजोंद्या बाबा मंदिर भायगाव रोड ते नामपुर रोड रस्त्याचे तात्काळ डागडूजीकरण करून साईड पट्टी विकास माती भराव टाकून केला जाईल, लवकरच या रस्त्याच्या पुनर्विकासासाठीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवू तसेच सटाण रोड ते जैन स्थानक रस्त्याच्या कामाचे परीक्षण करून संबंधित ठेकेदाराकडून काम योग्य गुणवत्तेचे करून घेण्यात येईल. संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
Comments
Post a Comment