निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पडावी यासाठी मतदार यादी आधार कार्ड लिंक करण्यात यावी...देशभरात होम टू होम मतदार पडताळणी व सर्वेक्षण मोहीम राबवण्यात यावी...आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे मुख्य निवडणूक आयुक्त, भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पडावी यासाठी मतदार यादी आधार कार्ड लिंक करण्यात यावी...

देशभरात होम टू होम मतदार पडताळणी व सर्वेक्षण मोहीम राबवण्यात यावी...आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे मुख्य निवडणूक आयुक्त, भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार

मालेगांव :- निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी देशभरात होम टू होम सर्वे करून मतदार यादीतील मतदारांचे नावे आधार कार्डशी जोडण्यात येऊन मतदान प्रक्रियेत बायोमेट्रिक मशीनचा वापर करण्यात यावा अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे तहसीलदार विशाल सोनवणे यांच्या मार्फत मुख्य निवडणूक आयुक्त, भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे करण्यात आली आहे.
    देशात मोठ्या प्रमाणावर एकाच व्यक्तीची दुबार, तीबार, स्पष्टपणे समजेल असे रहिवास पत्ता नसलेले, अस्पष्ट फोटो असलेले, नावात किरकोळ बदल करून बोगस नावे नोंदवलेले, मृत व्यक्ती तसेच एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नोंदविले आढळून येत आहे. त्यामुळे देशातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर तसेच निवडणूक आयोगाच्या पारदर्शक कारभारावर संशय निर्माण झाला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर  प्रश्नचिन्ह निर्माण होणे हे भारतीय लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे.
देशात दरवर्षी मतदान नोंदणी मोहीम राबवली जाते त्यासाठी बी एल ओ हे त्याला नेमून दिलेल्या संबंधित एरियात जाऊन मतदार नोंदणी करून घेतात. तसेच नागरिकांना स्वतः ऑनलाइन मतदार नोंदणी ची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मतदार नोंदणीचे सर्व अधिकार व जबाबदारी ही बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजेच बी एल ओ यांच्यावर निर्धारित करण्यात आलेली आहे. मतदार यादीत मतदाराचे नाव समाविष्ट करण्या अगोदर त्याचे योग्य ते पुरावे तपासून त्याला मान्यता देणे व नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे हे बी एल ओ चे काम असते. बी एल ओ यांच्या  चुकीच्या व निष्काळजी कारभारामुळे एकूणच भारतीय निवडणूक आयोगावर संशय निर्माण होत असल्याने बी एल ओ यांच्यावर याची जबाबदारी निर्धारित करून कारवाई होणे आवश्यक आहे.
            भारत देशात लोकशाही वरील नागरिकांचा विश्वास आढळ राहवा, भारतीय निवडणूक आयोगाची पारदर्शक नि:पक्ष प्रतिमा मजबूत व्हावी तसेच विश्वासार्हता वाढावी यासाठी होम टू होम जाऊन मतदार पडताळणी व सर्वेक्षण अभियान राबवण्याची गरज आहे. 
         देशात युनिक आयडेंटिटी  ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू.आय.डि.ए.आय. तर्फे प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड देण्यात आले आहे. भारत व विविध राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या  अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या आधार कार्डचा प्रभावी वापर केला जात आहे. आधार कार्डशी सर्व बँकिंग प्रणाली जोडली गेली आहे. त्याचबरोबर देश भरात धान्य वितरण करण्यासाठी रेशन दुकानात बायोमेट्रिक मशीनचा वापर केला जातो. ज्याचा आधार लिंक असेल व त्याचे हाताचे ठसे जुळत असतील त्यालाच धान्य मिळते. त्यामुळे धान्य वितरण प्रणालीत मोठी पारदर्शकता निर्माण होऊन भ्रष्टाचार कमी झाला आहे. 
            त्याच धर्तीवर मतदार यादीतील असलेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी मतदार यादी आधार कार्ड संलग्न करून मतदाराचे नाव थेट आधार कार्डद्वारे ऑनलाईन नोंदविण्यात यावे. ज्यामुळे देशभरातील विविध विधानसभा मतदारसंघात एकापेक्षा अधिक नाव असलेले मतदार ओळखणे सोपे जाईल, दुबार तिबार नावे चुकीचा रहिवास पत्ता वगैरे विषय संपुष्टात येतील. तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण करत असताना बायोमेट्रिक पद्धतीचा वापर केला जावा त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करता येऊ शकेल.
        तरी भारतीय निवडणूक आयोगाने सर्व विधानसभा मतदारसंघातील सदोष मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवून मतदार यादीतील मतदाराचे नाव आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी त्याशिवाय देशभरात कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी समितीचे संयोजक निखिल पवार, माजी उपनगराध्यक्ष प्रा के एन आहिरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे, माजी नगराध्यक्ष दीपक भोसले, माजी नगरसेवक मदन गायकवाड गुलाब पगारे सुरेश गवळी, काँग्रेस आय पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद खैरनार, महानगर उपाध्यक्ष इम्रान अजीज इंजिनियर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष भरत पाटील, शिवसेना उबाठा नेते कैलास तिसगे, लोकशाही धडक मोर्चाचे शेखर पगार, प्रवीण चौधरी, पै. दीपक पाटील, सुशांत कुलकर्णी, इंजि. सलाम कुरेशी, तुषार पाटील, गोपाळ सोनवणे,  प्रदीप पहाडे, दीपक बच्छाव, नितीन पाटील, डॉ. रवींद्र पाटील कैलास पाटील, प्रसाद गोलाईत, जिभाऊ पाटील, निसार शेख, संजय खडताळे आदी उपस्थित होते.

Comments