मालेगांव शहरातील प्रमुख व्यावसायिक तथा न्यू सरस्वती फर्निचर दालनाचे संचालक विनोद कुचोरिया यांनी आपल्या दुकानातील लाखो रुपयांच्या चायना वस्तू, तसेच एलईडी टीव्ही संच बाहेर काढून त्यांची होळी केली.... त्यांनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक

मालेगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देत चायनीज वस्तूंना बहिष्कार करण्याचे आवाहन केल्यानंतर मालेगावात व्यावसायिकांनी ठोस पाऊल उचलले आहे. शहरातील प्रमुख व्यावसायिक तथा न्यू सरस्वती फर्निचर दालनाचे संचालक विनोद कुचोरिया यांनी आपल्या दुकानातील लाखो रुपयांच्या चायना वस्तू, तसेच एलईडी टीव्ही संच बाहेर काढून त्यांची होळी केली. त्यांनी केलेल्या या कामाचे सर्वांनी कौतुक केले आहे.
या होळीत विविध प्रकारच्या चायना वस्तू, तसेच एलईडी टीव्ही संच जाळून निषेध नोंदवण्यात आला. "आता कधीही चायना वस्तू खरेदी किंवा विक्री करणार नाही," असा ठाम निर्धार व्यक्त करत कुचोरिया यांनी स्वदेशी वस्तूंवर भर देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. "देशी उत्पादनेच आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देतील," असे मत व्यक्त याप्रसंगी न्यू सरस्वती फर्निचर मॉल चे संचालक विनोद कुचेरिया यांनी व्यक्त केले आहे.
मालेगावातील या प्रतीकात्मक आंदोलनामुळे नागरिकांमध्येही स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याबाबत जागृती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. :- विनोद कुचोरिया, न्यू सरस्वती फर्निचर,  मालेगाव

Comments