कॅन्सर पूर्व तपासणी प्रत्येकासाठी आवश्यक: मेगा कॅम्पमध्ये सूर्योदय कॅन्सर सेंटर चे डॉक्टर भूषण निकम यांचे प्रतिपादन

कॅन्सर पूर्व तपासणी प्रत्येकासाठी आवश्यक:  मेगा कॅम्पमध्ये सूर्योदय कॅन्सर सेंटर चे डॉक्टर भूषण निकम यांचे प्रतिपादन

दाभाडी :-(प्रतिनिधी) | मालेगाव केवळ देशातच नव्हे तर जगात कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कॅन्सरचे पूर्व निदान केले पाहिजे.असे प्रतिपादन सूर्योदय कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख डॉक्टर भूषण निकम यांनी केले. दाभाडी रस्त्यावरील सूर्योदय कॅन्सर सेंटरमध्ये मेगा कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या मेगा कॅम्पमध्ये तब्बल साडेतीनशे रुग्णांची कॅन्सर तपासणी करण्यात आली.
   या शिबिराचे उद्घाटन आदरणीय अविष्कार अनिता दादाजी भुसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
   या शिबिरात मौखिक, शरीराची संपूर्ण तपासणी, महिलांच्या स्तनांची तपासणी, लिक्विड बेस्ट सायटोलॉजी पॅप स्मियर याशिवाय रक्ताच्या आवश्यक तपासण्या तसेच रक्तदाब मधुमेह आदींच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. सकाळपासून मोठी गर्दी या कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्प करिता होती. मालेगाव तसेच परिसरातील लहान मोठ्या गावातील नागरिकांनी कॅन्सर पूर्व तपासणी साठी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी कॅन्सर तज्ञ डॉक्टर भूषण निकम यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना कॅन्सरचे पूर्वनिदान होणे आवश्यक असून त्यासाठीच्या तपासण्या वेळीच केल्या तर भविष्यातील धोका टाळता येऊ शकतो असे मत मांडले. तसेच प्रत्येक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कॅन्सरची तपासणी करून घेणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्या मालेगावात कॅन्सरचे हक्काचे सूर्योदय कॅन्सर सेंटर उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यात पेट स्कॅन, रेडियशन, सर्जरी, केमोथेरेपी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सूर्योदय कॅन्सर सेंटरचे केंद्र प्रमूख निखिल मराठे देखील उपस्थित होते . त्यांनी रुग्णांची व्यवस्थित काळजी घेत प्रत्येक रुग्णाची व्यवस्थित तपासणी होत आहे की नाही याबाबत पाहणी केली. तसेच रुग्णांसाठी लहान मोठ्या गोष्टींची काळजी घेतली. या प्रसंगी मालेगाव तालुक्यातील रुग्णांची काळजी घेण्यासाठी तसेच मालेगाव शहरातून नाशिक जिल्ह्यातून कॅन्सर हद्दपार करण्यासाठी सूर्योदय कॅन्सर सेंटर प्रतिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सेंटरच्या वतीने व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. कैंसर सेंटरचे  डॉ. भूषण वानखेडे, डॉ एन निलिमा सुर्वे सोनवणे, डॉ एहसान शेख व संपूर्ण कैंसर सेंटर ची टीम उपस्थित होती..

Comments