आगामी उत्सव काळात गणेशभक्त व मंडळांना सुविधा उपलब्ध करुन देणे... मालेगांव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे आयुक्तांना निवेदन
आगामी उत्सव काळात गणेशभक्त व मंडळांना सुविधा उपलब्ध करुन देणे... मालेगांव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे आयुक्तांना निवेदन
मालेगांव :- येणाऱ्या गणेश उत्सव संदर्भात विविध समस्यांचे निवेदन महापालिका आयुक्त यांना देण्यात आले व तसेच नेहरू चौक ते शास्त्री चौक येथील रस्त्याची दुरवस्था झालेली असताना आज मालेगाव मध्यवर्ती गणेश समिती अध्यक्ष रिकी दादा पाटील यांनी मालेगाव महानगर पालिका आयुक्त यांना समक्ष भेटून रस्त्याची दुरवस्था झाल्याचे सांगितले व त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
१) सर्व प्रकारच्या मिरवणूक मार्गाची दुरुस्ती लवकरात लवकर करणेत यावा.
२) विकास कामे सुरु असलेले मनपा हद्दीतील कामे लवकरात लयकार पूर्ण करावीत किंवा मंडळासाठी तसेच गणेश भक्तांसाठी पर्याची व्यवस्था करावी.
३) मनपा प्रशासनाकडून प्रत्येक चौकात मिरवणूक मार्गावरील पिवळे हॅलोजन लाईट काढून त्याऐवजी पांढरे एलईडी दिवे लावणेत योवतेा जेणेकरून लख्ख आणि सुस्पष्ट प्रकाश निर्मिती होईल.
४) महादेव घाट गणेशकुंड पफरीसरात आकर्षक रोषणाई तसेच्च रामसेतु, मुख्य चौक ते धान्य बाजार मार्गात लाईट व्यवस्था करावी.
५) अवाढव्य वाढलेले च जीर्ण झालेली झाडे लक्षात घेऊन काटछाट करून किंवा पर्यायी उपाययोजना करून मिरवणूकीत अडचण होणार नाही याकामी दक्षता घ्यावी.
६) उत्सव काळात व पावसाळ्यात मनपा हद्दीत नियमीत स्वच्छता मोहीम राबवावी, नियमीत जंतुनाशके, किटकनाशक फवारणी धुरळणी करावी.
७) गणेशकुंड महादेव घाट परीसरात बिसर्जनदिनी आरतीसाठी टेबल्सची व्यवस्था करावी जेणेकरुन विटंबना होणार नाही.
८) गणेशकुंड महादेव घाट परीसरात विसर्जनदिनी शेवटचे विसर्जन हो पावेतो स्वच्छ पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी.
९) सर्व लहान मोठ्या मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटविणेत यावे; जेणेकरुन मिरवणूकीस कोणताही अडथळा होणार नाही.
१०) सर्व प्रकारच्या लहान मोठ्या मिरवणूक मार्गासाठी डांबरीकरण किंवा मुरुमचे विशेष प्रावधान असावे.
११) शहरातील तमाम महापुरुषांच्या स्मारक (पुतळ्यांना) प्रवेशद्वारांना आकर्षक रोषणाई करावी.
१२) मनपा प्रशासनाच्या वतीने गणेशभक्त किंवा लहान मोठ्या मंडळांना कुठलीही अडचण होऊ यासाठी मालेगांव शहर मध्यवती गणेशोत्सव समिती सोबत समन्वय राखावे.
१३) महादेव घाट गणेश कुंड परीसरात कचखडी टाकून रेलिंग करणेत यावी.
१४) उज्वला शाळा कलेक्टर पट्टा येथे रस्त्यावर पथदीव लावणेत यावेत.
१५) मोतीबाग नाका परीसरातून कलेक्टर पट्टाकडे जाणारे मार्गावर खडी मुरुम टाकणेत यावे.
१६) मालेगांव महानगरपालिकेचे बांधकाम विभाग, विद्युत विभाग, स्वच्छता विभाग, उद्यान विभाग यांची टीम उत्सव काळात कार्यान्वित करुन संबंधीत अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर उपलब्ध करुन देणेत यावे. असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.
यावेळी मध्यवर्ती समिती चे उपअध्यक्ष कल्पेश राजेंद्र शेलार , राज शाह प्रवक्ता अतुल महाले , पार्थ अमीन,निलेश पाटील, भरत पाटील,कैलास शर्मा, नेहरू ऐक्य मंडळाचे अध्यक्ष विनोद कुचोरिया व खजिनदार अनिल भावसार , महेश कोळपकर , मनोहर नामेकर , यश कोळपकर , हर्षल चव्हाण व चौकातील रहिवाशी उपस्थित होते.
Comments
Post a Comment