मातामठ तालीमचे समोरील डी.पी. जवळील घाणकचरा त्वरीत उचलणेबाबत तसेच श्री गणेशोत्सव व नवरात्रीचे काळात दिवसातून दोन वेळेस साफसफाई होणे व मिरवणूकीचे मार्गाचे त्वरीत काम होणे...मनपा उपायुक्तांना निवेदन....
मातामठ तालीमचे समोरील डी.पी. जवळील घाणकचरा त्वरीत उचलणेबाबत तसेच श्री गणेशोत्सव व नवरात्रीचे काळात दिवसातून दोन वेळेस साफसफाई होणे व मिरवणूकीचे मार्गाचे त्वरीत काम होणे...मातामठ तालीम वतीने मनपा उपायुक्तांना निवेदन....
मालेगांव :-मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त शिंदे साहेब यांना श्री मातामठ तालीम समोरील इलेक्ट्रिक डीपी जवळ रोज घाणीचे साम्राज्य असते वेळोवेळी निवेदन अर्ज देऊन सुद्धा मनपा दुर्लक्ष करते त्यामुळे दिवसातून दोन वेळा देवी मंदिरासमोरील असलेली घनकचरा उचलण्यात यावा गणेशोत्सव व नवरात्र काळात नेहमी घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरते त्यामुळे निवेदन देण्यात आले. सर्व तालमीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावर्षी दि. २७.८.२०२५ ते दि.६.९.२०२५ या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार असून त्यानंतर लवकरच नवरात्रीउत्सव साजरा होणार आहे. तरी आमचे मातामठ तालीसमोर विद्युत विभागाची डी. पी. असून सदर डी. पी. जवळ परीसरातील रहिवासी त्यांचे घरातील घाणकचरा, मांसाचे अवशेष व इतर कचरा आणून टाकतात. भटके व मोकाट कुत्रे मांसाचे तुकडे व हाडे उचलून मंदिराचे पायरीवर आणून टाकतात. परीसरात असह्य वास पसरून डास व माशांचा त्रास होतो. आमचे तालीम व देवी मंदिर तसेच मंदिरास लागून असलेले मशिदीचे समोर सदर गैरप्रकार होत असल्याने भाविकांच्या धार्मिक भावना दुखावतात.
Comments
Post a Comment