पुरातन किल्ला हनुमान मंदिरातील सभामंडपासाठी शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांनी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने ना. भुसे यांच्या सूचनेनुसार या कामाचे भूमिपूजन संपन्न
किल्ला हनुमान मंदिरातील सभामंडपासाठी शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांनी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने ना.भुसे यांच्या सूचनेनुसार या कामाचे भूमिपूजन संपन्न
मालेगाव : अंदाजे ३५० वर्ष जुने असलेल्या पुरातन किल्ला हनुमान मंदिरातील सभामंडपासाठी शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांनी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने ना. भुसे यांच्या सूचनेनुसार या कामाचे भूमिपूजन महंत विजय रामदासजी महाराज यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते प्रमोद शुक्ला यांच्या हस्ते गणेश स्थापनेच्या दिवशी करण्यात आले. याप्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते.
पेशव्यांचे सरदार नारोशंकरांनी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या धर्तीवर तत्कालीन दोन कोटी रुपये खर्च करून मालेगावच्या भुईकोट किल्लल्याचा कामाला सुरूवात केली. बांधकाम होत असलेले काम सातत्याने पडून जात होते. अखेर काशी येथील विद्वान ब्रह्मवृंदांना सन्मानपूर्वक बोलविण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत श्री किल्ला हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली. या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे श्री हनुमानाच्या दोन मूर्ती स्थापित करण्यात आल्या. हनुमानाच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर संपूर्ण किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होवू शकले. तसेच या मंदिरात आराधना केली असता प्रत्यक्ष हनुमानाची अनुभूती अनेकांना आल्याने हे तमाम मालेगावकरांचे व परिसरातील जनतेचे आराध्य दैवत झाले. पोळ्याची मिरवणुकही याच मंदिरापासून निघत होती. मंदिरात सातत्याने पुजारी जप आणि तप करीत असल्याने वातावरण अतिशय पवित्र आहे. दर शनिवारी येथे सुंदरकांडचा पाढ होत असून या कार्यक्रमात चार ते पाच हजार भाविक सहभागी होत असतात.
मालेगावबरोबरच परिसरातील अनेक गावांचे भाविकांचीही या मंदिरावर मोठी श्रद्धा आहे. सभामंडपासाठी निधी कमी पडत आहे याची माहिती हनुमान भक्तांनी ना. भुसे यांना कथन केली असता त्यांनी तात्काळ ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आणि श्री गणेश स्थापनेच्या दिवशी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पवनपुत्र हनुमान की जय, जय श्रीराम आदी घोषणा दिल्यानंतर या कामाचा शुभारंभ झाला.
या कार्यक्रमाला पुरुषोत्तम काबरा, ईश्वरदास जाखोटीया, कैलास शर्मा, नंदकुमार मंडावेवाला, पंडित सतीश उपाध्याय, लक्ष्मीनारायण सारडा, दीपक सावळे, अभिषेक भावसार, रमेश चौधरी, विजय चौधरी, शितल पवार, अशोक राणासरिया, पंकज दुसाने, महेश मोर, आशिष बडेरा, महेश शर्मा, मुकेश पारीख, कैलास जंगम, ब्रिजमोहन शुक्ला यांचेसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. भूमिपूजन झाल्यानंतर प्रमोद शुक्ला यांचा सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment