मालेगाव शहरातील वर्धमान शिक्षण संस्था संचलित श्री रतिलाल वीरचंद शाह विद्यालयात मंगळवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सखी सावित्री समिती अंतर्गत 7 वी ते 10 वी तील विद्यार्थीनी आणि मातांसाठी ' कळी उमलताना ' या विषयावर डॉ.योगिता गोकुळ खैरनार यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यालयाचे प्राचार्य मंगेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक स्मिता देशपांडे, प्रमुख व्याख्यात्या डॉ. योगिता खैरनार, वरिष्ठ लिपीक राजश्री ठाकरे, एन.आर. खैरनार, सखी सावित्री समितीच्या सदस्या पल्लवी देवरे उपस्थित होते.
सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. डॉ.खैरनार यांचा परिचय आर. एल.फडके यांनी करून दिला. यावेळी प्रमुख वक्त्या डॉ. खैरनार यांनी उपस्थित विद्यार्थीनी व माता पालकांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, तारुण्याकडे वाटचाल करताना विद्यार्थ्यांना शरीरात व मनात होणाऱ्या अनेक बदलांना सामोरे जावे लागते. अशावेळी काही प्रश्न पडू लागतात. काही शंका येतात. याविषयी त्यांनी माहिती दिली. मासिक पाळी कशी येते. त्यावेळेस शरीरात होणारे बदल, त्या काळात होणारा त्रास त्यामागील कारण, आहार, व्यायाम शरीरातील बदल त्यासाठी घ्यायची काळजी. शरीराची राखायची स्वच्छता त्याचबरोबर प्राणायाम, व्यायाम या सर्व गोष्टी आपल्या शरीर निरोगी राखण्यासाठी किती महत्त्वाचे आहे याविषयी सखोल मार्गदर्शन डॉ. खैरनार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.एस.पाटील यांनी केले. यावेळी सखी सावित्री समितीच्या सर्व महिला सदस्य शिक्षिका, माता पालक, व विद्यार्थीनी उपस्थित होत्या .
Comments
Post a Comment