हिंदू कधीही आतंकवादी नव्हता, नाही आणि नसणार... हिंदू धर्मावर लागलेला भगवा आतंकवादाचा कलंक पुसला गेला.. मालेगांव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेबद्दल आनंद उत्सव साजरा
हिंदू कधीही आतंकवादी नव्हता, नाही आणि नसणार... हिंदू धर्मावर लागलेला भगवा आतंकवादाचा कलंक पुसला गेला.. मालेगांव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेबद्दल आनंद उत्सव साजरा
मालेगाव शहरात सन 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा नागरिकांचा बळी गेला व शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. सदर बॉम्बस्फोटाच्या घटनेच्या आधारावर साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात आज 17 वर्षानंतर विशेष एन आय ए न्यायालयाने निकाल दिला.
कोणताही गुन्हा कोर्टात दाखल झालेल्या पुराव्यांच्या आधारे सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची बातमी प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्यानंतर मालेगाव शहरातील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गांधी पुतळा, मोसम पुलाजवळील चौकामध्ये एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा केला. यावेळी एकमेकाला पेढे भरवत, फटाके फोडून, वाजंत्रीच्या तालावर नाचताना घोषणा देऊन एकच जल्लोष करण्यात आला. सनातन हिंदू धर्म की जय, भारतीय संविधानाचा विजय असो, जय श्रीराम आदी घोषणांनी काही वेळ परिसर दणाणून सोडला होता. यावेळी उत्साही झालेल्या कार्यकर्त्यांनी एकमेकाला मिठी मारत प्रत्येकाला पेढे भरून आनंद व्यक्त केला. तसेच वाजंत्रीच्या तालावर नाचून दिवाळीप्रमाणे फटाके फोडत साध्वी प्रज्ञासिंग यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केल्याने हिंदू धर्मावर लागलेला भगवा आतंकवादाचा कलंक पुसला गेला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी मच्छिंद्र शिर्के, विनोद वाघ, निलेश आहेर, जगदीश गोऱ्हे, हरिप्रसाद गुप्ता, देवा पाटील, अजय वाघ, साहेबराव वाघ, विनोद निकम, तुषार शेवाळे, दादा जाधव, बन्सीलाल कांकरिया, सुधीर जाधव, भाग्येश वैद्य, सुरेशनाना निकम, नंदूतात्या सोयगावकर, योगेश गवळी, ऋषिकेश निकमयांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सन 2008 साली मालेगाव शहरात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये काँग्रेस सरकारने स्वतःकडे असलेल्या राजकीय सत्तेचा गैरवापर करून प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी सदर गुन्ह्यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह अन्य हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटकवण्याचा एक खोटा प्रयत्न होता.
Comments
Post a Comment