सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील म्हाळसाकोरे शिवारातील दरोडा प्रकरणी जेरबंद केलेल्या आरोपी मध्ये मालेगांवातील दोन सराईत गुन्हेगारांचा ही समावेश नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...


सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील म्हाळसाकोरे शिवारातील दरोडा प्रकरणी जेरबंद केलेल्या आरोपी मध्ये मालेगांवातील दोन सराईत गुन्हेगारांचा ही समावेश  नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

सायखेडा :-दि. १३/०७/२०२५ रोजी मध्यरात्रीचे सुमारास सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील म्हाळसाकोरे शिवारात अज्ञात चोरटयांनी संगणमत करून फिर्यादी राजेंद्र मुरकुटे यांचे राहते घराचे दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अनाधिकृतपणे संमतीशिवाय घरात प्रवेश करून त्यांचे कुटूंबियांना कोयत्याचा धाक दाखवुन, जिवे मारण्याचा दम देऊन फिर्यादीचे हातातील सोन्याची अंगठी, तसेच घरातील महिलांचे अंगावरील व कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने असा एकुण ३,८४,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरी करून चोरून नेला, तसेच म्हाळसाकोरे शिवारातील इतर चार साक्षीदार यांचे घरात देखील प्रवेश करून मारहान करून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनांबाबत सायखेडा पोलीस स्टेशन गुरनं. १२६/२०२५ भा. न्या. सं. कलम ३३१(६), ३०५(अ), ६२, ३(५), ३१० (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन, गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर व सायखेडा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. विकास ढोकरे यांचे पथकांनी वरील गुन्हयातील फिर्यादी, साक्षीदार यांनी व प्रत्यक्षदर्शीने बघितलेल्या आरोपीचे वर्णनावरून, तसेच घटनास्थळी मिळून आलेले भौतिक पुरावे, उपलब्ध पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळवून खालील संशयीतांना ताब्यात घेतले.
१) विशाल रमेश बनसोडे, वय २३, रा. सायने बु॥, ता. मालेगाव, जि. नाशिक

२) दिलीप अशोक चव्हाण, वय ३०, रा. सोमठाणे, ता. सिन्नर, जि. नाशिक

३) राहुल नाना चव्हाण, वय २६, रा. कुटेवस्ती, सायखेडा, ता. निफाड, जि. नाशिक

वरील संशयीतांना विश्वासात घेवून सखोल विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचे रायगड व मालेगाव येथील साथीदारांसह वरील घटनेच्या दिवशी रात्रीच्या वेळी मोटर सायकलीवर येवुन, वस्तीवरील घरांमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करून कोयत्याचा धाक दाखवून, जिवे मारण्याची धमकी देवुन महिलांचे अंगावरील व कपाटातील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरी करून नेले, तसेच इतरही चार ते पाच घरांमध्ये कोयत्याचा धाक दाखवून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली आहे. वरील आरोपींचे इतर साथीदारांबाबत तपास करून अधिक चौकशी केली असता, सदर आरोपी हे पाली पोलीस स्टेशन जि. रायगड येथील दरोडयाचे गुन्हयात अटक असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. सदर आरोपींची नावे खालील प्रमाणे
४) अजय एकनाथ चव्हाण, रा. असारे, ता. खालापुर, जि. रायगड, मुळ रा. खांडवी, ता. गेवराई, जि. बीड ५

५) आकाश पंजाबराव चव्हाण, रा. होराळे, पो. वावोशी, ता. खालापुर, जि. रायगड, मुळ रा. युसगाव, जि.छ. संभाजीनगर

६) सोमनाथ भानुदास चव्हाण, रा. भिलवली, ता. खालापुर, जि. रायगड, मुळ रा. ढालगाव, जामनेर, जि. जळगाव

७) रोहिदास उर्फ बन्नी चव्हाण, रा. अजंग वडेल, ता. मालेगाव (फरार)

यातील वरील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापूर्वी मुंबई शहर, सातारा, रायगड, पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, बुलढाणा, सोलापुर, ठाणे जिल्हयांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, दंगा दुखापत, अपरहरण, प्रोहीबीशन यासारखे एकुण २३ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. सदर आरोपी हे भाजीविक्री, मोबाईल अॅक्सेसरीज विक्री, गृहपयोगी चायना वस्तु विक्री करण्यासाठी मोटर सायकलवर येवुन खेडेगावातील वस्त्यांवरील घरांची पाहणी करून, नंतर सर्वजण एकत्र येऊन कट रचुन गुन्हा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींसोबत त्यांचे आणखी साथीदार देखील गुन्हयात सहभागी असण्याची शक्यता आहे, सदर आरोपीतांकडून वरील गुन्हयांप्रमाणे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

  वरील आरोपी क्र. १ ते ३ यांना सायखेडा पोलीस ठाणेकडील वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यांची सात पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. सदर आरोपीतांचे कब्जातुन गुन्हयात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटर सायकल, मोबाईल फोन, लोखंडी कोयता असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच इतर निष्पन्न आरोपीतांना ताब्यात घेवुन वरील गुन्हयाचा पुढील तपास सायखेडा पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. विकास ढोकरे यांचे पथक करीत आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळसाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, सायखेडा पो.स्टे.चे सपोनि श्री. विकास ढोकरे, स्थागुशाचे सपोनि योगिता कोकाटे, पोलीस अंमलदार हेमंत गरूड, सचिन धारणकर, दिपक गुंजाळ, हेमंत गिलबिले, प्रितम लोखंडे, प्रदिप बहिरम, सुभाष चोपडा, दत्ता माळी, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.


Comments