मालेगावच्या गुलशेर नगर परिसरात गोळीबार व प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात 'रब्बानी दादा' टोळीला पोलिसांचा दणका, जिथे दहशत माजवली तिथेच काढली धिंड...

मालेगावच्या गुलशेर नगर परिसरात गोळीबार व प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात 'रब्बानी दादा' टोळीला पोलिसांचा दणका, जिथे दहशत माजवली तिथेच काढली धिंड... 

 मालेगावच्या गुलशेर नगर परिसरात गोळीबार व प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात 'रब्बानी दादा' टोळीविरोधात पवारवाडी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.
 टोळीप्रमुख शेख रब्बानी शेख कादीर उर्फ रब्बानी दादा व त्याच्या तीन साथीदारांना अटक करून संपूर्ण परिसरातून धिंड काढण्यात आली.

 यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबाबत विश्वास वाढला असून दहशतीला चाप बसला आहे.

गुलशेर नगर भागात काही दिवसांपूर्वी शेख रब्बानी व त्याच्या टोळीने गावठी पिस्तुलाचा वापर करत गोळीबार केला होता.

यानंतर त्यांनी कोयता व लोखंडी पाईपने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.

या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

रब्बानी दादा व त्याची टोळी अनेक दिवसांपासून परिसरात गुंडगिरी, हप्ता वसुली, धमकी, आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय होती.

स्थानिक नागरिकांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.

नुकत्याच घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस विभागाने तातडीने लक्ष घालून या टोळीवर मोठी कारवाई केली.

पोलिसांनी या टोळीला अटक केल्यानंतर आरोपींची सार्वजनिक धिंड काढण्यात आली.


Comments