मालेगांव परिमंडळात अवैध धंदयावर कार्यवाही करणे कामी विशेष मोहिम राबविली जात असुन मालेगांव परिमंडळात अवैध धंदयावर कार्यवाही

मालेगांव परिमंडळात अवैध धंदयावर कार्यवाही करणे कामी विशेष मोहिम राबविली जात असुन मालेगांव परिमंडळात अवैध धंदयावर कार्यवाही

मालेगांव :- मा. श्री दत्तात्रय कराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र मा. श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण मा. श्री. तेगबीर सिंह संधू अपर पोलीस अधीक्षक, मालेगांव यांचे मार्गदर्शनात मालेगांव परिमंडळात अवैध धंदयावर कार्यवाही करणे कामी विशेष मोहिम राबविली जात असुन मालेगांव परिमंडळात अवैध धंदयावर कार्यवाही करणे कामी अपर पोलीस अधीक्षक मालेगांव यांचे स्तरावर स्थापन करण्यात आलेले विशेष पथकामार्फत दि.०५/०३/२०२५ रोजी पासुन ते दि. ०४/०८/२०२५ रोजी पावेतो मालेगांव परिमंडळ हददीत विविध पोलीस ठाणे हददीत पिटा कायदा, परकीय नागरीक, अवैध दारु, गांजा, जुगार, NDPS, गुटखा, गोवंश, ई.सी. अॅक्ट इत्यादी विविध ठिकाणी चोरुन लपुन चालणा-या अवैध धंदयावर छापा टाकुन खालील दिलेल्या तक्त्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
त्याच प्रमाणे मालेगांव परिमंडळ मध्ये एकुण ४२ हातभटटी नष्ट करुन २२५०० लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे.

छापा कारवाई पथक मा. श्री दत्तात्रय कराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र मा. श्री. बाळासाहेब पाटील, मा. पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण श्री. तेगबीर सिंह संधू, मा. अपर पोलीस अधीक्षक, मालेगांव यांचे मार्गदर्शनात पो.अं.३०४३ सचिन बेदाडे, पो.अं. ३१३१ दिनेश शेरावते, पो. अं. १३०५ अक्षय चौधरी, पो.अं.३०३६ शत्रुघ्न राठोड, पो.अं. १५३८ राकेश जाधव, पो.अं. २६९९ राम निसाळ यांनी केली आहे.

Comments