मालेगांव महानगर पालिकेसह येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पारदर्शीक व्हाव्यात यासाठी मतदार यादीतील बोगस मतदार, दुबार व तिबार तसेच मृत झालेले मतदार वगळण्यात यावे... शिष्टमंडळाने आयुक्त रवींद्र जाधव यांना निवेदन

मालेगांव महानगर पालिकेसह येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पारदर्शीक व्हाव्यात यासाठी मतदार यादीतील बोगस मतदार, दुबार व तिबार तसेच मृत झालेले मतदार वगळण्यात यावे... शिष्टमंडळाने  आयुक्त रवींद्र जाधव यांना निवेदन

मालेगांव महानगर पालिकेसह येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पारदर्शीक व्हाव्यात यासाठी मतदार यादीतील बोगस मतदार, दुबार व तिबार तसेच मृत झालेले मतदार वगळण्यात यावे याकरीता आयुक्त रवींद्र जाधव यांना गुलाब पगारे, निखिल पवार, मदन गायकवाड, दिपक भोसले, विवेक वारुळे, सुरेश गवळी, मनोज पवार, सोमा गवळी, प्रविण सोनवणे, निसार शेख, राजु आहिरे, तुषार ढिवरे,  युवा गिते, संजय खरताळे,  राजेंद्र शेलार, प्रताप पवार  आदींच्या शिष्टमंडळाने  निवेदन दिले.
       
       संपूर्ण देशात बोगस मतदारांबाबत काहूर उठले आहे. त्यातच मालेगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. धुळे लोकसभा, मालेगाव बाह्य विधानसभा व मालेगाव मध्य विधान सभा निवडणुकीच्या वेळी  गुलाब पगारे, सौ दिपाली विवेक वारुळे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रमोद पुरुषोत्तम उर्फ बंडू काका बच्छाव, माजी आमदार आसिफ शेख व अनेकांनी तक्रारी करून मतदार याद्यामधील मृत, विस्थापित, एकापेक्षा अधिक नोंदणी असलेल्या मतदारांची नांवे मतदार यादीतून कमी करणेबाबत तक्रारी दिल्या होत्या त्याप्रमाणे केवळ अल्प प्रमाणात काही नांवे वगळण्यात आली मात्र बरीच नांवे वगळण्यात आली नाहीत. राजकिय दबावामुळे व बोगस मतदानासाठी ती नांवे तशीच ठेवण्यात आलेली आहे आणि ह्याच विधानसभेच्या बोगस मतदारांची नांवे असलेल्या याद्या मालेगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीत वापरल्या जाणार असल्याचे समजते त्यास आमची हरकत आहे. 
         मालेगाव बाह्य व मालेगाव मध्य विधानसभेच्या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असून बोगस मतदारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या सदोष मतदार याद्या मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत वापरल्यास निवडणूक पारदर्शक होणार नाहीत. मृत, विस्थापित, स्थलांतरित, एकापेक्षा अधिक नोंदणी असलेल्या मतदारांची नांवे मतदार यादीतून कमी करूनच मतदानासाठी याद्या वापरण्यात याव्यात तरच निवडणूक पारदर्शकपणे पार पडेल. तसेच महापालिकेकडे मृत्यू झालेल्या लोकांची नांवे जन्म व मृत्यू विभागाकडे आहेत ती घेवून मयत नोंद असलेल्या मतदारांची नांवे वघळण्यात यावीत. ज्या मतदारांचे एका पेक्षा जादा नावे यादीत आहेत त्यांनी ०७ नं. चा फॉर्म भरून आपले नाव कमी करावे असे महापालिकेने आवाहन करून त्यांना कायद्याचा धाक दाखवून आपापले बोगस मतदान कमी करावे अन्यथा कडक कारवाई करणेत येईल असा इशारा महापालिकेने द्यावा. म्हणजे अशी दुबार नांवे कमी होण्यास मदत होईल. 
        यावेळी मालेगाव ११५ विधानसभा क्षेत्राला ११४ विधानसभा क्षेत्र जोडून असल्याकारणाने विधानसभा ११४ चे काही प्रमाणात मतदान मालेगाव बाह्य विधानसभा 115 मधील मतदान क्षेत्रात समाविष्ट आहे. त्या दुबार तिबार नावांचे पुरावे निवेदनासोबत आयुक्त जाधव यांना देण्यात आले.

गुलाब पगारे - मी सॉफ्टवेअर वापरून दुबार मतदारांची नांवे मतदार यादीतून काढू शकतो तर महापालिका हे काम का करू शकत नाही? तरी ही यंत्रणा दुबार मतदारांची नांवे वघळण्यासाठी वापरण्यात यावी.

निखिल पवार - निवडणूक शाखा  राजकीय दबावात काम करत असून विशिष्ट राजकीय नेत्यांना व पक्षाला निवडणूक सोपी जावी यासाठी मदत केली जाते. बीएलओ यांच्या मार्फत प्रामाणिकपणे काम करून दुबार तिबार मयत स्थलांतरित नावे शोधून ती कमी करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे. महापालिका व शासनाच्या निवडणूक विभागाने अशी बोगस नावे कमी न केल्यास जन आंदोलन उभे केले जाईल.

दिपक भोसले - मतदार यादीतील दुबार तिबार नावे शोधून ती निवडणूक आयोगाकडे वगळण्यासाठी पाठवावेत व तशी प्रत आम्हाला देखील उपलब्ध करून द्यावी.

मदन गायकवाड - रात्रंदिवस जनतेची सेवा करून विकास कामे करून देखील बोगस मतदानामुळे निवडणूक लढवावी का नाही हा प्रश्न माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यापुढे निर्माण झाला आहे.

विवेक वारुळे - निवडणूक शाखेच्या वतीने सांगितल्याप्रमाणे वारंवार लेखी  हरकती घेऊन देखील बोगस व मृत मतदान कमी केले जात नाही याला जबाबदार कोण ?

Comments