मालेगांव :-येथील लोढा भवन येथे वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीवर आलेल्या भामट्याने हिसकावून पळ काढला होता. या घटनेला आठ दिवस उलटले असून पोलिसांनी यातील एकाला कल्याण येथून अटक केली आहे.
येथील चंद्रकांत दत्तात्रय शिरोडे (वय ५०, रा. लोढा भुवन) यांच्या आई दत्त मंदिरातून लोढा भुवन मार्गे घरी जात होत्या. घरी जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या अली हसन अफसर उर्फ अबु मेला जाफरी (२५, रा. पाटील नगर, अंबिवली, कल्याण) व कासीम अफसर इराणी (रा. कल्याण) यांनी दोन तोळे वजनाची ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन चोरी केली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरी करणाऱ्या अली हसन याला ३० जुलैला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याच्याकडून पोलिसांनी ८० हजाराची सोन्याची चैन व ८० हजार रुपये किंमतीची बर्गमॅन (एमपी ०५ झेडसी ८१०१) मिळून आली. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी करीत आहेत.
Comments
Post a Comment