स्वकर्तृत्वावर शून्यातून विश्व निर्माण करणारे नाव म्हणजे अशोक लक्ष्मणदास बैरागी ऊर्फ बैरागीमामा,

स्वकर्तृत्वावर शून्यातून विश्व निर्माण करणारे नाव म्हणजे अशोक लक्ष्मणदास बैरागी ऊर्फ बैरागीमामा

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म, शालेय जीवनातच वडिलांना व्यवसायात मदत, प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण, महाविद्यालयीन जीवनात खो-खो खेळाच्या माध्यमातून चमकदार कामगिरी, मुंबईला पेट कारखान्यात नोकरी, मुंबईहून मालेगावी परतीचा प्रवास, स्वतःची पेंट फॅक्टरी पाठोपाठ दीपक गॅस एजन्सीच्या माध्यमातून नूतन व्यवसायाचा शुभारंभ केला अन् मागे वळून पाहिले नाही. गॅस एजन्सीच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. व्यवसायात स्थिरस्थावर होताच समाजकारण, राजकारण, शिक्षण व धार्मिक क्षेत्रात काम, अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी, शहरातील अग्रणी मामको बँकेचे सलग ३६ वर्षे संचालक, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून भरघोस काम, मंदिरांवा स्वखचनि जीणों द्वार असे बहुआयामी नेतृत्व व स्वकर्तृत्वावर शून्यातून विश्व निर्माण करणारे नाव महणजे अशोक लक्ष्मणदास बैरागी ऊर्फ बैरागीमामा, मामा म्हणजे दुनिया का सबसे किमती तोफा, एक अच्छा मित्र है, जो किमत से नहीं किस्मत से मिलता है..!' असं व्यक्तिमत्त्व.
   मामा १८ ऑगस्टला ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांचे जीवन हे समाजासाठी जर्स आदर्शवत, तसे ते तरुण पिढीसाठी प्रेरणादायी, या व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास थक करणारा आहे, त्यांचा या वयातील उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. त्यांचा जन्म संगमेधर, मालेगावी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आईचं नाव सी. गीताबाई, वडिलांचं नाव लक्ष्मणदास बैरागी, त्यांना तुळशीदास हे भाऊ आणि सौ. मीराबाई शंकरदास बैरागी ही एकुलती एक बहीण, वडिलांची गुळबाजारात हनुमान सोडा फॅक्टरी होती. वडील धार्मिक विचारांचे आणि प्रभू श्रीरामाचे निस्सीम भक्त. श्रीराम मंदिरात नित्य सेवेनंतर ते व्यवसायाला लागत. गोरगरिबांना शक्य ती मदत करणं हा त्यांचा पिंड, हेच संस्कार बालपणी मामांबर झाले, लहान-थोर मालेगावकर त्यांच्यातील ममत्च, मृदुता, गोडवा या स्वभावामुळे त्यांना 'मामा' म्हणून संबोधतात,
त्यांचे चौथीपर्यंतचे (१९५६ ते १९६०) शिक्षण मोसमपूल मनपा शाळेत झाले. पाचवी ते अकरावी, जुनी मॅट्रिक लोकमान्य शाळेत झाले. ११ वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी एमएसजी कॉलेजला उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. १९७४ ला ते प्रथम श्रेणीत पदवी झाले. त्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाचे मैदानही गाजविले. खो-खोचे कॅप्टनपदही भूषविले. बारामती व धुळे येथील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पधांत महाविद्यालयाला विजेतेपद मिळवून दिले. २२ फेब्रुवारी १९७६ ला प्रतापपूर, (ता. साक्री, जि. धुळे) येथील कमलाबाई आणि लालदास बैरागी यांच्या सुकन्या मंगलाबाई यांच्याशी विवाह झाला. 

नोकरीचा त्याग व्यवसायाचा संकल्प 

  मामांनी वडिलांना व्यवसायात मदत केली. विवाह झाल्याने स्वतःचा संसार स्वतःच्या हिमतीवर उभा करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. आप्तेष्ट सुरेश वैष्णव यांनी त्यांना पुनावाला यांच्या फैमको केमिकल कंपनी, कल्याण येथे अकाउंटंट म्हणून १८० रुपये पगाराने नोकरीस लावले. या कंपनीत आरशाला मागील जो पेंट असतो त्याचे समीकरण अभ्यासत सर्व माहिती शिकून घेतली. या काळात त्यांनी कल्याण कोळसेवाड़ी, अभंग सोसायटीच्या जिन्याखाली लहानशी खोली भाड्याने घेतली. पत्नी सौ. मंगलाताई व मुलगा विनोद यांच्यासह तेथे वास्तव्य केले. मोठ्या खोलीसाठी त्यांनी पुनावालांकडे पगारवाढ मागितली. तीन वर्षे मेहनतीने काम करूनही कंपनीने पगारवाढ दिली नाही. यातूनच ते स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या ध्येयाने १९८२ ला मालेगावी परतले, मित्रांच्या सहकायनि त्यांनी कुणाल पेंट नावाने लहान पेंट बनवण्याची फैक्टरी चालू केली. या नव्या व्यवसायात त्यांनी अथक परिश्रम आणि चिकाटीतून लौकिक मिळवल्याने आत्मविश्वास वाढला. ५ फेब्रुवारी १९८३ ला गॅस एजन्सीसाठीची जाहिरात वृत्तपत्रात आल्याचे मित्रांनी त्यांना सांगितले. त्यांनी अर्ज केला. नशिबाने साथ दिली. मामांनी दि. १० जून १९८४ ला दीपक गॅस एजन्सीची स्थापना केली. ४७ वर्षात शहरासह तालुक्यात नामांकित व विश्वासार्ह गॅस एजन्सी म्हणून ५० हजारांहून अधिक ग्राहक जोडले. यात कर्मचा-यांनी त्यांना नेहमीच चांगली साथ दिली. मामांनी नेहमीच चांगली, तत्पर व विनम्र सेवेचा आग्रह धरला. सर्व कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा भाग म्हणून वागणूक, सर्वांच्या मुलांना शिक्षणासाठी दरवर्षी शालेय साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जपतात. मोठ्या सणाला आर्थिक मदत करतात. कर्मचाऱ्याच्या घरी कोणी आजारी असल्यास मदत करून, कुटुंचातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात. मामांचा तोच वारसा मुलगा ज्ञानेश्वर (बालू) जपत आहे. २०२४ मध्ये रमेश आणि ब्रदर्स नावाचा पेट्रोलपंप घेतला, त्यातही चांगले यश मिळाले.

  समाजकारण व राजकारण मामा समाजकारणात सुरुवातीपासूनच होते. त्यांनी १९८९ मध्ये मालेगाव मर्चेंट्स को-ऑप. बँकच्या संचालकपदाची पहिल्यांदा निवडणूक लढवत प्रचंड मतांनी जिंकली. १९८९ पासून आजपर्यंत मामा ३६ वर्षापासून मामको बैंकेत सातत्याने निवडून येताहेत. त्यांनी १९९५ ते १९९६ मामको बँकेचे चेअरमनपद भूषविलेले. मामको जनकल्याण ट्रस्टचे चेअरमन असताना त्यांनी ट्रस्टसाठी १४ हजार सक्केअर फूट जमीन खरेदी केली. त्यांचे शिक्षण, सहकार, धार्मिक, सामाजिक, विविध क्षेत्रांतील योगदान उल्लेखनीय आहे. २५ वर्षांपासून लायन्स क्लबचे सदस्य आहेत. संगमेश्वरातील संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट, साधना वाचनालय व अजिंठा शिक्षण संस्थेचे विश्वस्त आहेत. संत सावता महाराज मंदिर ट्रस्टचा सप्ताह सोहळा, इतर उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मामांनी १९८९ मध्ये संगमेश्वरातील श्री राम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.

१९९३-९५ मध्ये राममंदिराचा जीर्णोद्धार केला. अमर गणेश मित्रमंडळाच्या स्थापनेपासून गणेशोत्सवातही त्यांचा सहभाग असती. ते अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेचेही अध्यक्ष आहेत. शिक्षण प्रसार, समाज उद्धारासाठी ते सेवारत आहेत. मामांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांच्या अधांगिनी सौ. मंगलाताईंनी समर्थ साथ दिली. नोकरी सोडून व्यवसाय करण्याच्या निर्णयात त्या खंबीरपणे सोबत उभ्या राहिल्या. परिवार, कुटुंबाची, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेऊन सामध्यनि पार पाडल्याने मामांना व्यवसायावर लक्ष केंद्रित करता आले. मामांना कारने प्रवासाची आवड, त्यांनी कारनेच संपूर्ण भारतभ्रमण केले. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते कोलकाता हा प्रवास कारनेच केला, बहुतांश धार्मिकस्थळे, पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. चारधाम यात्रा दोनदा केली. दरवर्षी तिरुपती बालाजी न चुकता जातात. या वयातही कार प्रवासात त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्यांना कारचालक दादा सटाणकर यांनी नेहमीच साथ दिली. सध्याचे कारचालक गणेश खैरनार हे मामांची आपल्या काकांप्रमाणे काळजी घेतात. तारुण्यात त्यांनी सायकलिंगचा छंदही जोपासला. दोनदा भारत भ्रमण केल्यानंतर त्यांनी १० विविध देशांना भेटी देत तेथील संस्कृती जाणून घेतली. यात युरोप, दक्षिण आफ्रिका, स्पेन, पोर्तुगाल, थायलंड, सिंगापूर, दुबई, भूतान, नेपाळ, इंडोनेशिया देशांचा समावेश आहे.

अॅड. मुरलीधर गिते, अनिल कलंत्री, कैलास सावकार या मित्रांचा त्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. यासह अनेक जीवाभावाचे मित्र आहेत. त्यांनी यशस्वी व्यावसायिक व समाजकार्यात आदराचे स्थान मिळवले. कुटुंबाला एकत्र ठेवत प्रत्येकाला यशस्वी केले. मार्माना दोन मुलं आणि दोन मुली. मोठा मुलगा विनोद आजोबा व बडिलांचा आदर्श ठेवत फार्मसीचे उच्चशिक्षण घेऊन केबीएच स्मरणिका समिती ट्रस्ट संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्राचार्यपदी आहे. लहान शानेश्वर ऊर्फ बालू वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळतो. मामा निरपेक्ष वृत्तीने कसलीही अपेक्षा न ठेवता मदत करतात. हा उज्ज्वल बसा आणि वारसा जपण्याचा निर्धार या भावंडांनी केला आहे.

Comments