आज भारत स्वतंत्र दिना निमित्त स्वातंत्र्य सैनिक उद्यान भायगाव रोड मालेगाव कॅम्प येथे वॉल कंपाऊंड दुरुस्ती व सोयी सुविधा पुरवण्याच्या कामाचे भूमिपूजन मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते संपन्न
आज भारत स्वतंत्र दिना निमित्त स्वातंत्र्य सैनिक उद्यान भायगाव रोड मालेगाव कॅम्प येथे वॉल कंपाऊंड दुरुस्ती व सोयी सुविधा पुरवण्याच्या कामाचे भूमिपूजन मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते संपन्न
मालेगांव :-आज भारत स्वतंत्र दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक उद्यान भायगाव रोड मालेगाव कॅम्प येथे वॉल कंपाऊंड दुरुस्ती व सोयी सुविधा पुरवण्याच्या कामाचे भूमिपूजन मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
मालेगाव महानगरपालिका हद्दीतील कॅम्प गावठाण भागात सव्वा एकर जागेवर भारत स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचा गौरव म्हणून राज्यातील वेगळे असे प्रेरणादायी स्मारक निर्माण व्हावे अशी संकल्पना स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या वतीने 2003 साली तत्कालीन मनपा आयुक्त डी जे फिलीप्स यांच्याकडे मांडण्यात आली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत या ठिकाणी बल्ली तारेचं कंपाउंड करून वृक्षारोपण करण्यात आले होते. शासकीय जागा असल्यामुळे मनपा प्रशासन त्यावर खर्च करून शकत नव्हता, त्यावेळी अनेक आंदोलन करून महाराष्ट्र शासनाकडून सदर जागा ही महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून घेण्यात आली व त्यावर सन 2013-14 मध्ये वॉल व तार कंपाऊंड करून घेण्यात आले होते. अमृत योजनेतून जॉगिंग ट्रॅक व उद्यान विकसित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत तार कंपाऊंड व प्रवेशद्वार मोडकळीस आले असून त्याची दुरुस्ती करून उद्यानात सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निखिल पवार यांनी वारंवार मनपा प्रशासनाकडे केली होती.
त्याला मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सन 2024-25 च्या अंदाजपत्रकात वीस लाख रुपयांची तरतूद करून कामाचे कार्यादेश दिले आहेत. तार कंपाऊंड जाळीची दुरुस्ती प्रवेशद्वार व भायगाव रस्त्याला लागत फ्लेवर ब्लॉक फिटिंग, ग्रीन जिम, योगा व व्यायामासाठी मैदानाचा विकास, जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती, स्वच्छतागृहची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच वृक्ष लागवड, बैठक व्यवस्था बेंच, लहान मुलांच्या खेळण्यासाठीचे साहित्य, विद्युत व्यवस्था करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केल्याची घोषणा आयुक्त जाधव यांनी केली.
यावेळी निखिल पवार यांनी सांगितले की मागील काळात, स्वातंत्र्य सैनिक उद्यानाबाबत राजकीय मंडळींकडून काही अप्रिय बदनामीकारक पोस्ट केल्या जात होत्या. स्वातंत्र्य सैनिक उद्यान हे स्वातंत्र्य सैनिकांचे ते एक पवित्र स्मारक आहे त्याच्या संरक्षण व सन्मान राखणे ही एका व्यक्तीची जबाबदारी नसून स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रत्येक वारसाने व परिसरातील नागरिकांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी पुढे आलं पाहिजे. या उद्यान रुपी स्मारकाच्या विकासासाठी मनपा प्रशासनाने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी रघुनंदन सावकार, वसंत पाटील, धनंजय वैद्य, कीर्ती पवार, दिलीप सारंगे, उद्यान अधीक्षक निलेश पाटील, अतिक्रमण अधीक्षक भरत सावकार, स्वराज पवार, जतीन पवार, शौर्य पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment