पवारवाडी पोलीस ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई...... चोरीच्या ३० मोटर सायकल किं. १८ लाख रू.व ३ लाख रुपये ट्रक्टर असा एकुण २१ लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत.... पवारवाडी पो.स्टे. सह किल्ला, छावणी, मालेगाव कॅम्प, नांदगाव, निफाड, पिंपळगाव, कळवण, चांदवड, पंचवटी पो.स्टे. नाशिक शहर, धरणगाव पो.स्टे. जळगाव अशा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे १४ गुन्हे उघडकीस....
पवारवाडी पोलीस ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई...... चोरीच्या ३१ मोटर सायकल किं. १८ लाख रू.व ३ लाख रुपये ट्रक्टर असा एकुण २१ लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत....
पवारवाडी पो.स्टे. सह किल्ला, छावणी, मालेगाव कॅम्प, नांदगाव, निफाड, पिंपळगाव, कळवण, चांदवड, पंचवटी पो.स्टे. नाशिक शहर, धरणगाव पो.स्टे. जळगाव अशा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे १४ गुन्हे उघडकीस....
मालेगांव :-नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या अनूषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. तेगबिर सिंह संधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहायक पोलीस अधिक्षक सिध्दार्थ बरवाल यांनी नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांतील आरोपींचे सध्याचे वास्तव्याबाबत माहिती घेवून पवारवाडी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री राहुल खताळ यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल खताळ यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार हे नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा तपास करीत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहेजाद सैयद एकबाल रा सलमताबाद मालेगाव व शेख युसुफ शेख अयुब रा. गुलशेर नगर, मालेगाव यांनी पवारवाडी पोलीस स्टेशन कडील गु.र.नं. १९०/२०२५ व १९६/२०२५ मधील गाडी चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने संवदगाव फाटा परिसरात सापळा रचून गुन्हेगार नामे शहेजाद सैयद एकबाल व शेख युसुफ शेख अयुब दोन्ही राहणार मालेगाव यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हयातील मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे
यातील ताब्यात घेतलेला आरोपी शहेजाद सैयद एकबाल व शेख युसुफ शेख अयुब यांना अधिक विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता, त्याने त्याचा साथीदार शेख नाजीम अब्दुल हमिद रा. रौनकाबाद, मालेगाव व प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भुषण रा. संवदगाव ता. मालेगाव व देवीदास नानाजी वाघ रा.संवदगाव ता. मालेगाव यांनी नाशिक जिल्हयात तसेच मालेगाव तालुका व शहर परिसरातून एकूण ३० मोटर सायकल व १ द्रक्टर चोरी केल्याची कबुली दिली असून सदर मोटर सायकलचे वर्णन खालील प्रमाणे :-
वरील आरोपी शहेजाद सैयद एकबाल व शेख युसुफ शेख अयुब शेख नाजीम अब्दुल हमिद व प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भुषण व देवीदास नानाजी वाघ यांचे कब्जातून चोरीच्या ३० मोटर सायकल किं. १८ लाख रू.व ३ लाख रुपये ट्रक्टर असा एकुण २१ लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून, सदर आरोपीने कबुली दिल्यावरून पवारवाडी पो.स्टे. सह किल्ला, छावणी, मालेगाव कॅम्प, नांदगाव, निफाड, पिंपळगाव, कळवण, चांदवड, पंचवटी पो.स्टे. नाशिक शहर, धरणगाव पो.स्टे. जळगाव अशा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे १४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यांना पवारवाडी पोलीस स्टेशन कडील गु.र.नं. १९०/२०२५ व १९६/२०२५ बी एन.एस कलम ३०३ (२) या गुन्हयात हजर करण्यात आले असून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. तेगबिर सिंह संधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहायक पोलीस अधिक्षक सिध्दार्थ बरवाल यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोनि श्री. राहुल खताळ, सपोनि किरण पाटील, पो.हवा. राकेश उबाळे, पो. हवा. संतोष सांगळे, निलेश निकम, जाकिर पठाण, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड यांचे पथकाने मोटर सायकल चोरीचे १४ गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.
Comments
Post a Comment