छावणी पोलीस स्टेशन मोठी कारवाई.... रोकडोबा हनुमान मंदिरातील चांदीचा मुकुट चोरणाऱ्या तिघांना अटक....चांदीचा न वाटल्याने भंगारवाल्यास विकल्याची कबुली...

छावणी पोलीस स्टेशन मोठी कारवाई.... रोकडोबा हनुमान मंदिरातील  चांदीचा मुकुट चोरणाऱ्या तिघांना अटक....चांदीचा न वाटल्याने भंगारवाल्यास विकल्याची कबुली... 

(दाभाडी तीन आरोपींना अटक केल्यावर पोलिस. शेजारी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ.) 

दाभाडी (ता. मालेगाव) येथील रोकडोबा हनुमान मंदिरातील शनि महाराजांच्या चांदीच्या मुकुटची चोरी झाली होती. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 
(दाभाडी तीन आरोपींना अटक केल्यावर पोलिस. शेजारी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ.) 

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यापुर्वी सटाणा व चांदवड येथे मंदिरात चोरी केलेल्या भावराव पवार (३५, रा. सावरगाव, येवला), भगवान पिंगळे (रा. शिंगवे, ता. चांदवड) या दोघांना अटक केली. त्यांनी मुकूट चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याबरोबर शिंगवे (ता. चांदवड) येथील भाऊसाहेब बोरसे देखील सहभागी होता. पोलिसांनी तिघांना ४ ऑगस्टला मनमाडहून अटक केली. त्यांनी ८० हजार रुपये किंमतीचा चांदीचा मुकूट चोरी केला होता. तिघांनी मुकूट चोरी केल्याची कबुली दिली. तिघा चोरट्यांना तो मुकूट चांदीचा वाटला नाही. 
(दाभाडी तीन आरोपींना अटक केल्यावर पोलिस. शेजारी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ.) 

   तिघांनी गावात भंगारसाठी येणाऱ्या फेरीवाल्याला विकल्याचे सांगितले. सदर मुकूट अद्यापपर्यंत पोलिसांना मिळाला नाही. पोलिस भंगारवाल्याचा शोध घेत आहेत. तसेच पोलिसांनी केलेल्या या कामगारीबद्दल दाभाडी गावातील सरपंच, उपसरपंचांनी पोलिसांचा सत्कार केला. सदरील घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी करीत आहेत.

Comments