मालेगाव शहरातील सुजाण नागरिकांनी जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देऊन 2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निपक्षपाती व पारदर्शक SIT मार्फत फेर तपास करण्यात यावा...
मालेगाव शहरातील सुजाण नागरिकांनी जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देऊन 2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निपक्षपाती व पारदर्शक SIT मार्फत फेर तपास करण्यात यावा...
मालेगाव, दि. १ ऑगस्ट :मालेगाव शहरातील सुजाण नागरिकांनी जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देऊन 2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निपक्षपाती व पारदर्शक SIT मार्फत फेर तपास करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन काँग्रेस सरकारने खोटा “भगवा दहशतवाद” हा नॅरेटीव्ह पुढे करून निष्पाप हिंदूंना आरोपी बनवले होते. तब्बल १७ वर्षांनी, दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी माननीय NIA विशेष न्यायालयाने सर्व हिंदू आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मात्र या प्रकरणातील खरे मास्टरमाईंड व “सिमी संलग्न संघटनेचे” संशयित आरोपी आजही मोकाट फिरत आहेत, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
नागरिकांनी १४ किलो RDX गायब होणे, भिक्कू चौकातील जमाव हिंसा, तत्कालीन IPS अधिकारी विरेश प्रभू यांच्यावर झालेला हल्ला तसेच राजकीय दबावाखाली खोटे आरोपी तयार करण्यात आल्याचे मुद्दे अधोरेखित करत, त्याची SIT मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तसेच या प्रकरणात विशेष न्यायालयाचे गठन करून खरी मास्टरमाईंड आरोपींवर कारवाई करण्यात यावी व निर्दोषांना न्याय मिळावा, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे.निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास काका बोरसे, अमन परदेशी व डॉ. चैतन्य देवरे,बंटी हिरे, भाग्येश वैद्य आदी जण उपस्थित होते.
प्रत रवाना,
१] मा. प्रधानमंत्री भारत सरकार,
२] मा. गृहमंत्री भारत सरकार,
३] मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य
४] मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक
५] मा. पोलीस उपअधीक्षक साहेब, मालेगांव
Comments
Post a Comment