मालेगाव : तालुक्यातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक व व्यावसायिक शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे मिळावेत यासाठी दाभाडी येथील जिल्हा परिषद शाळेत विविध विषयांवर आधारित प्रयोगशाळा जिल्हा परिषद नाशिकच्या माध्यमातून तयार करण्यात आली असून महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुक्रवारी २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता या प्रयोगशाळेचे उदघाटन केले जाणार आहे.
या प्रयोगशाळेची निर्मिती 'मेकर घाट' या संस्थेने केली असून सदर प्रयोग शाळेत विज्ञान व व्यावसायिक शिक्षणावर आधारित ९ प्रकारची दालने असणार आहेत त्यात ३डी प्रिंटिंग आणि प्रोटोटाइपिंग, संगणक आणि एआय लॅब, लाकूडकाम कार्यशाळा, इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स प्रयोगशाळा, कला स्टुडिओ, डिझाइन थिंकिंग स्टुडिओ, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र प्रयोगशाळा, भौतिकशास्त्र प्रयोगशाळा, शिक्षण प्रयोग केंद्र यांचा समावेश आहे. यामुळे मालेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासात मोठी भर पडणार आहे या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.आशिमा मित्तल, शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, दाभाडीचे सरपंच प्रमोद निकम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेंचे मुख्याध्यापक उपस्थित राहणार असल्याचे मालेगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी सांगितले.
Comments
Post a Comment