महात्मा गांधी तंटामुक्ती समितीने एका बाहेरगावी राहणाऱ्या महिलेला व बाहेर गावाहून येणाऱ्या युवा उद्योजकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला...

दाभाडी :- येथील श्रीमती नीलिमा अरविंद मोरे यांचा दाभाडी बायपास रोड येथे गाळा भाड्याने देण्यात आला होता ,त्या गाळ्यात कापड फॅक्टरी प्रवीण देवरे यांनी टाकली असता बिहार येथील व्यापारी भैय्यालाल राधेश्याम यांनी प्रवीण देवरे धुळे येथील नवीन युवा उद्योजकाला फसविले व श्रीमती नीलिमा मोरे यांच्या मालकीचे सदर दुकानाचे एक वर्षापासून भाडे थकवले होते व सदर दुकानातील सामान काढत नव्हेत यासाठी,गेल्या काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीकडे तक्रार केल्यानंतर ,तंटामुक्ती कार्यकारणी समितीने, अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी वादी प्रतिवादी यांच्यामध्ये तीन ते चार तारखा सलग घेऊन समझोता केला, प्रवीण देवरे यांना भाडे रकमेत  सूट देऊन त्यांना एका महिन्याची मुदत व दुकान भाड्यात तीन चार महिन्याची सूट देण्यात आली,त्यानुसार आज रोजी प्रवीण देवरे यांनी सदर दुकानाचे राहिलेले भाडे देवून श्रीमती मोरे यांचा व्यवहार पूर्ण केला आहे व आपला शब्द पाळला...दोनही बाजूंनी समन्वय साधत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीने एका बाहेरगावी राहणाऱ्या महिलेला व बाहेर गावाहून येणाऱ्या युवा उद्योजकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला...

Comments