मालेगाव भाजपा सांस्कृतिक आघाडी शहर अध्यक्षपदी श्री. सतिश झुंबरलाल उपाध्याय यांची निवड


मालेगाव भाजपा सांस्कृतिक आघाडी शहर अध्यक्षपदी  

श्री. सतिश झुंबरलाल उपाध्याय यांची निवड 

मालेगांव :- भारतीय जनता पार्टी मालेगाव पच्छिम सांस्कृतिक आघाडी "शहर अध्यक्षपदी" श्री. सतिश झुंबरलाल उपाध्याय यांची  निवड करण्यात आली असून  भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री संदीपजी भूसे हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले. यावेळी
भाजपा जिल्हा अध्यक्ष निलेश कचवे सर, मा.जिल्हा अध्यक्ष दादासाहेब जाधव, मा. जि.प.सदस्य समाधान हिरे, भाजपा तालुका अध्यक्ष संजय बाबा हिरे,भारतीय जनता पार्टीचे महानगरप्रमुख देवा पाटील, डाॅ. तुषार दादा शेवाळे,सुरेश नाना निकम यांनी प्रदान केले. 
भारतीय जनता पार्टी मालेगाव पच्छिम सांस्कृतिक आघाडी "शहर अध्यक्षपदी" आपली नेमणूक करण्यात येत असून ह्या सार्थ नेमनुकीबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन ।
भारतीय जनता पक्ष हे कार्यकर्ताधिष्टीत जनसंघटन असून याचा पाया सवादाच्या सूत्रावर बांधण्यात आला आहे. पक्षाचे पदाधिकारी या नात्याने हा पाया बळकट करण्याची जबाबदारी आता आपल्या सक्षम खांद्यावर असेल.

बूथ सक्षमीकरण, कार्यकर्ता संवाद आणि जनसंपर्कातून समर्थन या त्रिसूत्री मूलमंतत्रावर आपल्याला येत्या काळात काम करायचे आहे. भाजपाचा सदस्य म्हणून आपण जोडून घेतलेली प्रत्येक व्यक्ती पक्षासाठी महत्वाची असणार आहे. त्याचबरोबर भाजपाचे अंत्योदयाचे धोरण आपल्याला जनमानसात घेऊन जायचे आहे.

लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे. आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळत आहे. आपल्या कार्यकुशल नेत्यांच्या नेतृत्वात देश आणि महाराष्ट्राची प्रगती होत आहे. समाजाच्या तळागाळ पर्यंत, सर्व घटकांना या प्रगतीचे भागीदार बनविण्याचा आपला उद्देश आहे. त्यासाठी अखंड कार्य आपण करावे. अशी माझी आपणांस आग्रहाची विनंती आहे.

'राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि शेवटी स्वतः' या निष्ठेने आपण काम कराल, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. येत्या काळात आपण संघटना बळकट करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या विकासासाठीचे दूत व्हावे, अशा सदिच्छा देतो.

आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा..!

Comments