किल्ला पोलीस ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई..... महामार्गावर कारमधून ७७ किलो गांजा जप्त.... मालेगावातील तरुणासह अन्य तिघे अटकेत; पावणेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत...

किल्ला पोलीस ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई..... महामार्गावर कारमधून ७७ किलो गांजा जप्त.... मालेगावातील तरुणासह अन्य तिघे अटकेत; पावणेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत...

मालेगाव : शहरालगत असलेल्या मनमाड चौफुली परिसरात पोलिसांनी छापा टाकून एका कारमधून तब्बल ७७ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी मालेगावच्या तरुणासह अन्य तिघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून कारसह एकूण ९ लाख ८१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने खळबळ उडाली असून मालेगाव शहर व परिसरात सुरु असलेली अवैध आमंली पदार्थांची वाहतूक आणि विक्री पुन्हा एकदा चर्चेला आली आहे.
मंगळवारी (दि.२२) रोजी रात्री येथील किल्ला पोलिसांनी केलेल्या या कारवाईत हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मनमाड चौफुली परिसरात उभी असलेली कार क्र. (एम. एच. १४ सी.एक्स. ६९०६) ची पोलिसांनी तपासणी केली. या कारमध्ये वेगवेगळ्या पिशवीमध्ये जवळपास ७७ किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी एन.डी.पी. एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सय्यद सलमान सय्यद शफिक (वय २८, रा. कुसुंबारोड, मालेगाव) या तरुणासह राहुल मगनसिंग लकवाळ (वय ३०), आकाश राजू जाधव (वय ३४) (दोघे रा. सिंदखेडराजा, बुलढाणा), श्रीरंजन नितीन पवार (वय २१, रा. वैजापुर, छत्रपती संभाजीनगर) या चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पावणे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी किल्ला पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल तावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुरज गुंजाळ, पोलीस निरीक्षक एस.बी. पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. संशयित चौघांविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहे.


Comments