कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई... मालेगांव शहर व शहर परीसरातून चोरीस गेलेल्या एकुण 23 मोटार सायकल (अंदाजे 8,20,000/-रुपये किमंतीच्या) एक सराईत आरोपी व त्याचें साथीदाराकडुन जप्त...
कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई...
मालेगांव शहर व शहर परीसरातून चोरीस गेलेल्या एकुण 23 मोटार सायकल (अंदाजे 8,20,000/-रुपये किमंतीच्या) एक सराईत आरोपी व त्याचें साथीदाराकडुन जप्त...
मालेगांव (कॅम्प):-मा. पोलीस अधिक्षक श्री बाळासाहेब पाटील सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री तेगबिर सिंग संधु सो, तसेच मालेगांव कॅम्प उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुरज गुंजाळ सो. तसेच अति. कार्यभार श्री नितीन गणापुरे सो व मालेगांव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री दिपक पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मालेगांव कॅम्प पोलीस ठाणे कडील दाखल गु.र. नंबर 57/2025 भारतीय न्याय संहीता चे कलम 303, (2) प्रमाणे दिनांक 14/03/2025 रोजी दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास चालु असताना दिनांक 24/07/2025 रोजी कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री दिपक पाटील यांना मिळालेल्या गोपनिय बातमीनुसार त्यांनी त्यांचे पथकातील अंमलदार यांना डि.के. चौक या ठिकाणी नमुद गुन्हयातील संशयीत इसम हा चोरी केलेली मोटार सायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहीती दिली व सदर ठिकाणी सापळा रचुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते, त्या अनुशंगाने पोलीस पथकाने सापळा रचुन एक संशयित नामे 1) भाऊसाहेब उत्तम चव्हाण वय 36 वर्षे राह-सोयगांव मालेगांव यांस ताब्यात घेवून सदर इसमाचे ताब्यात मिळुन आलेल्या सलेन्डर प्लस मोटार सायकली बाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले त्यानंतर त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने सदरची मोटार सायकल हो चोरीची असल्याचे कबुली दिल्याने सदरची मोटार सायकल गुन्हयामध्ये जप्त करून सदर आरोपीस गुन्हयामध्ये अटक करून दिनांक 25/07/2025 रोजी मा. न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्यास विश्वासात घेवुन अधिक चौकशी केली असता त्याने सदर मोटार सायकल व्यतीरीक्त 22 मोटार सायकल मालेगांव शहर व परीसरातुन चोरी करून 12 मोटार सायकल विक्रीसाठी दोन वेगळया ठिकाणी लावल्याची माहीती सांगुण व इत्तर 10 मोटार सायकल त्याने त्याचा साथीदार इसमनामे न्हानु भगवान जाधव वय- 24 वर्षे राहणार जैताने ता. साक्रि जि. नंदुरबार याला विक्री केल्याचे सांगितल्याने पोलीसांनी आरोपी क्रंमाक 1) भाऊसाहेब उत्तम चव्हाण वय- 36 वर्षे राह-सोयगांव मालेगांव याचेकडुन एकुण 12 मोटार सायकली गुन्हयाचे तपासामध्ये जप्त केल्या असुन आरोपी क्रंमाक 2) न्हानु भगवान जाधव वय- 24 वर्षे राहणार जैताने ता. साक्रि जि. नंदुरबार याचेकडुन 10 मोटार सायकल अश्या 22 मोटार सायकल व गुन्हयातील 01 मोटार सायकल अश्या एकुण 23 मोटार जप्त करण्यात आल्या असुन अधिक तपास चालु आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री बाळासाहेब पाटील सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री तेगबिर सिंग संधु सो श्री सुरज गुंजाळ सो, तसेच अति. कार्यभार श्री नितीन गणापुरै सो व मालेगांव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री दिपक पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार, सचिन गोसावी, हितेश भामरे, रुपचंद पारधी, दिपक हेंबाडे, राजेंदसिंग राजपुत, पोशि/ हर्षल पवार, लखन पवार यांनी कारवाई केली असुन सदर गुन्हयाचा तपास वरीष्ठांचे आदेशान्वये सहा. पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ हे करीत आहेत. नागरीकांना आवाहन आहे कि, ज्या नागरीकांचे मोटार सायकल चोरी गेल्या असतील त्यांनी मालेगांव कॅम्प पो.स्टे. येथे जप्त मोटार सायकलींची पडताळणी करून आपली मोटार सायकल असल्यास कागदपत्र सादर करून ती घेवुन जावी.
Comments
Post a Comment