पवारवाडी पोलीसाची मोठी कारवाई.... मालेगाव शहरात कॉरेक्स बाॅटल विकणारा आरोपी पोलीसाच्या ताब्यात १०० कोडीनयुक्त कॉरेक्स बॉटल जप्त..

पवारवाडी पोलीसाची मोठी कारवाई.... 

मालेगाव शहरात कॉरेक्स बाॅटल विकणारा आरोपी पोलीसाच्या ताब्यात १०० कोडीनयुक्त कॉरेक्स बॉटल जप्त.. 

मा. पोलीस अधिक्षक श्री. बाळासाहेब पाटील सो. अपर पोलीस अधिक्षक श्री. तेगबिर सिंग संधू सो. तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहायक पोलीस अधिक्षक श्री. सुरज गुंजाळ सो यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस स्टेशनचे नवीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. राहुल खताळ सो. यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार दि.२१/०७/२०२५ रोजी इसम नामे मोमीन अबू ओसामा अब्दुल मजिद रा. मालेगाव व सैय्यद वसिम सैय्यद जलील रा. सुरत राज्य गुजरात हे नशाकारक कोडेनयुक्त कॉरेक्स बाटल विक्री करण्यासाठी मालेगाव शहरात आणत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर इसमावर छापा कारवाई करणेकामी गुन्हे शोध पथकाचे सपोनि. पाटील, पो.हवा.राकेश उबाळे, संतोष सांगळे, निलेश निकम, विनोद चव्हाण, उमेश खैरनार, सचिन राठोड, नवनाथ शेलार, व दोन पंच असे पथक तयार करुन रात्री ०७:०० वा. इसम नामे मोमीन अबू ओसामा अब्दुल मजिद रा. मालेगाव यास छापा टाकून पकडले त्याच्याकडे कोडेनयुक्त Rexnox T कंपनीच्या १०० बॉटल नशा करणेसाठी वापरले जाणारे ३०,०००/- रुपये किमतीच्या बॉटल मनुष्याचे मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ तसेच साठा त्यांचेकडे खरेदी बिल नसतांना तसेच विक्री करण्याचा कोणताही परवाना अगर वैद्यकीय क्षेत्राचे कोणतेही ज्ञान अगर पदवी नसतांना अथवा कोणत्याही डॉक्टरची लिहुन दिलेली प्रिस्क्रिप्शन शिवाय स्वताच्या आर्थिक फाय‌द्यासाठी खुल्या बाजारात विक्री करण्यास प्रतिबंध असतांना देखील अवैधरित्या विक्री व वितरण करण्याच्या उ‌द्देशाने स्वताच्या कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने त्याने सदर १०० बॉटल हया इसम नामे संसेव्यद वसिम सैय्यद जलील रा. सुरत राज्य गुजरात याचे कडून घेतल्याने त्यासही ताब्यात घेवून त्याच्यावर पवारवाडी पो.स्टे. गु.र.नं. १८०/२०२५ NDPS Act ८ C, २२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास PI खताळ सर हे करित आहे

Comments