सौ. कां.र.शाह प्राथ विद्‌यालयात 'माता-पालक समिती व पालक-शिक्षक समिती संघाची स्थापन

सौ. कां.र.शाह प्राथ विद्‌यालयात 'माता-पालक समिती व पालक-शिक्षक समिती संघाची स्थापन

मालेगांव :-(मोसम गिरणा न्युज, मालेगांव) :-वर्धमान शिक्षण संस्था संचलित सौ. कांताबेन रतिलाल शाह प्राथमिक विद्‌यालयात शैक्षणिक वर्ष सन २०२५-२०२६ साठी 'माता-पालक' व 'पालक-शिक्षक सहविचार सभा आयोजित करण्यात आली. या सभे अंतर्गत पालक व शिक्षक यांच्यात विचार व तक्रारींबाबत अंतरक्रिया होऊन विद्‌यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाची दुरदृष्टी विचारात घेऊन तक्रार निवारणासाठी 'माता-पालक समिती व पालक-शिक्षक समिती स्थापन करण्यात आली.
वि‌द्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री नितीन ठाकरे हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच व्यास-पिठावर शाळेचे मान्यवर पर्यवेक्षिका श्रीम. देसले, श्री जी. जे जोशी उपस्थित होते. अध्यक्ष निवड व अनुमोदन श्री. जोशी सर यांनी केले. पालक सभेचे प्रास्ताविक तसेच पालकांच्या समस्या निवारणासाठी श्रीमती, निलिमा पंजे यांनी विविध उपाययोजना यामध्ये सुचविल्या व पालक - शिक्षक समित्यांची रचना व त्यांचे कार्य याविषयी त्यांनी माहिती दिली.
यानंतर उपस्थित पालकांच्या संमतीने चालक श्री. वडगे यांची पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी पालकांच्या वतीने श्री. योगेश चव्हाण, श्री. चंद्रकांत अहिरराव यांनी मनोगत व्यक्त केले. वि‌द्याथ्यार्थ्यांची गुणवत्ता, आरोग्य व सर्वांगिण विकास या विषयांवर चर्चा व निर्णय घेण्यात आले.
पालक शिक्षक संघासह उपस्थित महिला पालकी -मधून माता-पालक संघाच्या प्रतिनिधींची निवड करण्यात आली. यावेळी समिती सदस्य श्री. ज्ञानेश्वर परदेशी, सौ अहिरे, सौ. प्रमाणे आदि उपस्थित होते. शेवटी वंदे मातरम गायनाने सभेची सांगता करण्यात आली.

Comments