आधी शाब्दिक चकमक… नंतर फटाके फुटले… पोलिसांचा विरोध झुगारत मालेगावात जल्लोष, बॉम्बस्फोटाचा निकाल येताच हिंदुत्ववादी रस्त्यावर
मालेगावच्या भिक्कू चौकात बॉम्बस्फोट झाला आणि संपूर्ण देश हादरला. आज या बॉम्बस्फोटाचा निकाल लागलाय. आरोपींच्या विरोधात पुराव्यांचा अभाव असल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. या निकालानंतर मालेगावत आनंद साजरा केला जात आहे.
मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.35 वाजता बॉम्बस्फोट झाला आणि संपर्ण देश हादरला. आज या बॉम्बस्फोटाचा निकाल लागलाय. आरोपींच्या विरोधात पुराव्यांचा अभाव असल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. सर्वांची निर्दोष मुक्तता होताच मालेगावात हिंदुत्ववादी संघटना जल्लोष करताना दिसत आहेत. ढोलताशा आणि नाचून आपला आनंद हा हिंदुत्ववादी संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.
एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा करताना अनेक लोक दिसत आहेत. यादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना फटाके फोडण्यास मज्जाव करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांची समजूत काढताना पोलिस दिसले. हिंदुत्ववादी संघटनांकडून मालेगावात मिरवणूक काढण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे फोटो हातात घेऊन अनेकजण या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसत आहे.
हिंदुत्वादी संघटनांना फटाके फोडण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आल्यानंतर हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाली. जल्लोष करतेवेळी फटाके फोडण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस आणि हिंदु संघटना कार्यकर्ते यांच्या वाद झाला. पुण्यातील पतीत पावन संघटनेचे कार्यकर्ते कर्नल पुरोहित यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर फटाके फोडणार आहेत तसेच आनंदउत्सव साजरा करणार आहेत. हिंदुवादी संघटना जल्लोष करण्यासाठी फटाके फोडल्यावर ठाम आहे.
यासोबतच मालेगावात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या फोटोला दुग्धाअभिषेक करण्यात आला. कार्यकर्त्यांचा आनंद गगणात मावेना असे झाले आहे. पोलिसांनी मज्जाव करता देखील कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. आजच्या या निकालाकडे फक्त राज्याच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या नजरा होत्या. शेवटी तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्याला कशाप्रकारे या प्रकरणाचा त्रास झाला आणि दिला हे सांगितले आहे, यादरम्यान त्यांना रडू आले. सर्व आरोपींनी कोर्टात हात जोडून धन्यवाद मानले आहेत.
मालेगाव शहरात सन 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा नागरिकांचा बळी गेला व शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. सदर बॉम्बस्फोटाच्या घटनेच्या आधारावर साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात आज 17 वर्षानंतर विशेष एन आय ए न्यायालयाने निकाल दिला.
कोणताही गुन्हा कोर्टात दाखल झालेल्या पुराव्यांच्या आधारे सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची बातमी प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्यानंतर मालेगाव शहरातील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गांधी पुतळा, मोसम पुलाजवळील चौकामध्ये एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा केला. यावेळी एकमेकाला पेढे भरवत, फटाके फोडून, वाजंत्रीच्या तालावर नाचताना घोषणा देऊन एकच जल्लोष करण्यात आला. सनातन हिंदू धर्म की जय, भारतीय संविधानाचा विजय असो, जय श्रीराम आदी घोषणांनी काही वेळ परिसर दणाणून सोडला होता. यावेळी उत्साही झालेल्या कार्यकर्त्यांनी एकमेकाला मिठी मारत प्रत्येकाला पेढे भरून आनंद व्यक्त केला. तसेच वाजंत्रीच्या तालावर नाचून दिवाळीप्रमाणे फटाके फोडत साध्वी प्रज्ञासिंग यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केल्याने हिंदू धर्मावर लागलेला भगवा आतंकवादाचा कलंक पुसला गेला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी मच्छिंद्र शिर्के, विनोद वाघ, निलेश आहेर, जगदीश गोऱ्हे, हरिप्रसाद गुप्ता, देवा पाटील, अजय वाघ, साहेबराव वाघ, विनोद निकम, तुषार शेवाळे, दादा जाधव, बन्सीलाल कांकरिया, सुधीर जाधव, भाग्येश वैद्य, सुरेशनाना निकम, नंदूतात्या सोयगावकर, योगेश गवळी, ऋषिकेश निकम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सन 2008 साली मालेगाव शहरात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये काँग्रेस सरकारने स्वतःकडे असलेल्या राजकीय सत्तेचा गैरवापर करून प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी सदर गुन्ह्यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह अन्य हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटकवण्याचा एक खोटा प्रयत्न होता.
परंतु 17 वर्षानंतर आज भारतीय संविधानाने दिलेल्या आधारावर कायद्याच्या मर्यादेत सदर गुन्हा कोर्टात सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे, याचा सर्व हिंदू बांधवांना अभिमान आहे. तसेच यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, हिंदू कधीही आतंकवादी नव्हता, नाही आणि नसणार.
- मच्छिंद्र शिर्के
Comments
Post a Comment