शाह विद्यालयाचा गाळणे वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण उपक्रमऐतिहासिक गाळणे किल्ल्याला दिली क्षेत्रभेट


शाह विद्यालयाचा गाळणे वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण उपक्रम

ऐतिहासिक गाळणे किल्ल्याला दिली क्षेत्रभेट 

मालेगाव शहरातील वर्धमान शिक्षण संस्था संचलित श्री रतिलाल वीरचंद शाह विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत गाळणे वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. तसेच इतिहास व भूगोल विषय समिती अंतर्गत किल्ले गाळणे येथे ऐतिहासिक ठिकाणा क्षेत्रभेट देण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य मंगेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत या कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 दरवर्षी हरित सेना अंतर्गत वृक्षारोपण केले जाते. तसेच ऐतिहासिक ठिकाणाला भेट दिली जाते. यंदा तालुक्यातील गाळणे वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गाळणे वनपरिक्षेत्राचे वनरक्षक संकेत मुंडे, सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब नेरकर, बाळासाहेब अहिरे, रविंद्र पवार, पर्यवेक्षक स्मिता देशपांडे, हरित सेना समिती प्रमुख के.जे.जाधव उपस्थित होते. वनपरिक्षेत्रात वृक्षलागवड कशी करावी याविषयी मुंडे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून वृक्ष संवर्धनाचे बदलत्या काळातील महत्व अधोरेखित केले. पर्यावरण रक्षण व वृक्षांचे जतन संवर्धन हा संस्कार या उपक्रमातून रुजवला जाईल. या उपक्रमासाठी वनविभागाचे सहकार्य मिळाल्याने आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षकांनी सुमारे १ हजार वृक्षांची लागवड यावेळी केली.
         दुपार सत्रात वन भोजनाचा आस्वाद घेऊन ऐतिहासिक अशा गाळणे किल्ल्याला भेट देण्यात आली. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी गर्जना करीत विद्यार्थ्यांनी गाळणे किल्याची चढाई केली. यावेळी हिरवाईने नटलेले निसर्गसुख डोळ्यात साठवून घेतले. इतिहास विषय समिती प्रमुख टी. के.देसले यांनी ओघवत्या शैलीत किल्ल्याचा इतिहास उलगडून सांगितला. यावेळी प्राचार्य सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना इतिहास भूगोल विषयाची गोडी लागण्यासाठी क्षेत्रभेट हा स्तुत्यू उपक्रम आहे. ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांनी जपला पाहिजे. निसर्गाच्या सहवासात गेले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन एन.के.गायकवाड यांनी केले. यावेळी एम. टी.शेवाळे, आर.एल.फडके, एन.आर.खैरनार, वरिष्ठ लिपीक राजश्री ठाकरे,वाय. ए. वाघ, एस. टी.हाडोळे, एच.एस. दुकळे,एस.आर.बिरारी, वाय.पी. लाडे, एस.बी. अहिरे, सौरभ डांगचे, आर.टी.बोरसे, आर.एन.पाटील, सी.एस.देशपांडे, प्रसाद अहिरे, किरण माळी, गिरीश निकम आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Comments