मालेगांव शहरातील तोडलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करणे न झाल्यास अन्यथा सार्वजनिक नागरी सुविधा समिती रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल.... होणारे सर्वस्वी परीणामास मनपा प्रशासन जबाबदार राहिल.... मालेगांव शहरात गणेश आगमन व विसर्जन मिरवणूकीचे मार्गावरील तारांची उंची वाढविणे अडथळा येणाऱ्या जागेवर मिरवणूक स्थगित करणेत येईल, सर्वस्वी जबाबदारी वीज कंपनीची राहिल...
मालेगांव शहरातील तोडलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करणे न झाल्यास अन्यथा सार्वजनिक नागरी सुविधा समिती रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल.... होणारे सर्वस्वी परीणामास मनपा प्रशासन जबाबदार राहिल....
मालेगांव :-गेल्या बऱ्याच दिवसांपासून मालेगांव शहरात भूमिगत गटार योजना राबविणेत येत असून मोठ्या प्रमाणावर शहरातील रस्ते तोडणेत आले आहेत. सदर योजना राबवित असताना त्या रस्त्यावरील काम पूर्ण झाले असेल तरी काँक्रीटीकरण करणेस विलंब होत आहे. तरी गणरायाच्या महोत्सवात गणेश आगमन व विसर्जन मिरवणूकीच्या मार्गावर सणाचे पूर्वीच काँक्रीटीकरण करणेत यावे. दि. २७.८.२०२५ रोजी गणरायाचे आगमन होणार असून दि.६.९.२०२५ रोजी विसर्जन होणार आहे. त्या अगोदर शहरातील मुख्य मार्ग व पारंपरीक विसर्जन मार्गाचे ताबडतोब काँक्रीटीकरण करणेत यावे. आमचे मागणीचे पूर्ततेस विलंब होत असल्यास त्याबाबतचे कारणांची माहिती मिळावी. अन्यथा समिती रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल व होणारे सर्वस्वी परीणामास मनपा प्रशासन जबाबदार राहिल.
आपले माहितीसाठी श्री गणेश स्थापना दि. २७.८.२५ व विसर्जन दि.६.९.२०२५ रोजी आहे हे कळवित आहोत.
मालेगांव शहरात गणेश आगमन व विसर्जन मिरवणूकीचे मार्गावरील तारांची उंची वाढविणे अडथळा येणाऱ्या जागेवर मिरवणूक स्थगित करणेत येईल, सर्वस्वी जबाबदारी वीज कंपनीची राहिल...
मालेगांव :- अनेक वर्षांपासून सणासुदीचे काळात ऐन वेळेवर शांतता कमिटीचे बैठकीत रस्त्यावरतील लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचेबाबत प्रश्न उपस्थित केला जातो. परंतु गणेश विसर्जन होऊन वर्ष लोटून गेलेवरही तो प्रश्न तसाच प्रलंबीत राहतो. लोंबकळत्या विद्युत तारांमुळे मिरवणूक मार्गावर अडथळा निर्माण होऊन मिरवणूक रेंगाळण्याची पाळी येते; कारण मिरवणूक चालू असताना श्रींची मूर्ती जवळपास १० फुटापेक्षाही अधिक मोठी असते व त्या वेळेस त्याचे आजुबाजूस सजावटही असते. त्यामुळे मिरवणूक मार्ग सुरळीत न राहता अनेक ठिकाणी मिरवणूक जाताना कुठेतरी अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित वा वित्तहानी होण्याचा संभव असतो. आम्ही जर वेळोवेळी शांतता कमिटीचे बैठकीत प्रश्न उपस्थित करीत असतो; त्याचे गांभिर्य आपणास नाही का? या वर्षी मिरवणूक मार्गावरील लोंबकळत्या विद्युत तारा बाजुला सारुन उंची वाढविली नाही तर अडथळा येणाऱ्या जागेवर मिरवणूक स्थगित करणेत येईल, अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल याची नोंद घ्यावी ही विनंती. १० दिवसात आपण तारांची उंची वाढविणार आहात किंवा कसे याबाबत उत्तर अपेक्षित आहे.
आपले माहितीसाठी श्री गणेश स्थापना दि. २७.८. २५ व विसर्जन दि.६.९.२०२५ रोजी आहे हे कळवित आहोत.
Comments
Post a Comment