मालेगांव :-भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता सुनिल शेलार यांची भाजपा युवा मोर्चा मालेगांव तालुका दाभाडी मंडळ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून तसे पञ भाजपा जिल्हा अध्यक्ष निलेश कचवे सर, मा.जिल्हाअध्यक्ष दादासाहेब जाधव, मा. जि.प.सदस्य समाधान हिरे, भाजपा तालुका अध्यक्ष संजय बाबा हिरे यांनी प्रदान केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले सुनिल शेलार यांनी यापुर्वी बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, तालुका चिटणीस, तालुका सरचिटणीस, जिल्हा सरचिटणीस, चांदवड देवळा विधानसभा विस्तारक, नाशिक पुर्व विधानसभा विस्तारक अश्या विविध संघटनात्मक पदांवर काम केले आहे. या निवडी बद्दल त्यांचे मालेगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच अजंग वडेल दाभाडी आघार रावळगाव चंदनपुरी काष्टी डाबली निळगव्हाण भायगाव ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment