मालेगाव शहरात गोळीबार करून प्राणघातक हल्ला करणारे सराईत गुन्हेगार ४८ तासाच्या आत जेरबंद...देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...


मालेगाव शहरात गोळीबार करून प्राणघातक हल्ला करणारे सराईत गुन्हेगार ४८ तासाच्या आत जेरबंद...

देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई... 

(मोसम गिरणा न्युज,संपादक:-श्री.कैलास धोंडू माळी, 
मोबाईल नं. 9423476961) 

मालेगांव  :-दि. २९/०७/२०२५ रोजी मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे येथे गुरनं १८५/२०२५ भा.न्या.सं. कलम १०९, १८९(२), १९१ (२), १९१(३), १९० सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ५/२७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी जाकिर अब्दुल रशिद, रा. गुलशेरनगर, मालेगाव यांचा भाऊ नामे अनिस शेख रशिद उर्फ अनिस मटकी यास आरोपी नामे ख्बानी याने दोन दिवसापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याचेकडील गावठी कट्टयातुन गोळी झाडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्याचे सोबत असलेले ०४ अनोळखी साथीदार यांनी अनिस शेख यास त्यांचेकडील कोयता तसेच लोखंडी पाईपने डावे पायावर, डोक्यात व उजवे हातावर वार करून गंभीर दुखापत केली म्हणुन गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा केल्यानंतर यातील आरोपी ख्यानी व त्याचे साथीदार हे फरार झाले होते.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू यांनी यातील आरोपीतांना तात्काळ अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पवारवाडी पोलीसांचे पथक खाना केले होते. सदर घटना घडल्यानंतर यातील आरोपी रब्बानी याने त्याचे इतर साथीदारांसह पलायन केले होते, त्यानुसार स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांना खब-यांमार्फत मिळालेल्या बातमीनुसार यातील फरार आरोपी हे म्हाळदे शिवारात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यावरून स्थागुशाचे पथकाने वरील गुन्हयाचे समांतर तपासात ११ हजार कॉलनी, म्हाळदे शिवारात सापळा रचुन यातील खालील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे.
१) शेख रब्बानी शेख कादीर उर्फ रब्बानी, वय ३४, रा. गुलशन-ए-इब्राहिम, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक

२) नईम अख्तर अब्दुल करीम उर्फ नईम टिक्का, वय ३८, रा. ग.नं.१, घरनं. २०२४, आयशानगर, मालेगाव

३) शेख वामिस शेख युनूस, वय २२, रा. अक्सा कॉलनी, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक

४) शेख शब्बीर शेख फारूक उर्फ बीरे, वय २४, रा. दातार नगर, ६० फुटी रोड, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक
वरील ताब्यात घेतलले आरोपीतांना विश्वासात घेवुन चौकशी केली असता, त्यांनी दि.२९/०७/२०२५ रोजी मालेगाव पवारवाडी हद्दीतील जव्वा हॉटेल परिसरात यातील फिर्यादी यांचा भाऊ नामे अनिस शेख रशिद उर्फ अनिस मटकी यास मागील भांडणाची कुरापत काढुन यातील आरोपी ख्बानी याने त्याचेवर गावठी कट्ट‌यातुन गोळया झाडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच रब्बानी याचे साथीदार यांनी लोखंडी पाईप व कोयत्याने अंगावर हाता-पायावर, डोक्यावर वार करून गंभीर जखमी केलेबाबत कबुली दिली आहे.
यातील आरोपी शेख वामिस शेख युनूस याचे अंगझडतीमधुन एक देशी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टा) हस्तगत करण्यात आलेले आहे. तसेच आरोपी शेख रब्बानी शेख कादीर हा मुख्य आरोपी असून त्याने त्याचे साथीदारांसह वरील गुन्हा केल्याचे उघडकीस आलेले आहे. सदर आरोपी हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर यापुर्वी मालेगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे एकुण ०७ गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीना गुन्हयाचे पुढील तपासकामी पवारवाडी पोलीस ठाणेकडील वरील गुन्हयात हजर करण्यात आले आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, शाम पवार, सविन वराडे, विशाल गोसावी, सुभाष चोपडा, गिरीष निकुंभ, शरद मोगल, संदिप राठोड, दत्ता माळी, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने यातील आरोपीतांना ताब्यात घेवुन घातक अग्निशस्त्र हस्तगत केले आहे.

Comments