बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगांवात नारीशक्ती मोर्चा


बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगांवात नारीशक्ती मोर्चा

मालेगाव येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महिलांची आज रोजी संध्याकाळी बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल या ठिकाणी झालेल्या महिलांच्या बैठकीमध्ये मालेगाव येथे नुकत्याच घडलेल्या खाजगी रुग्णालयातील बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी नारीशक्ती मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 
रविवारी पहाटेच्या सुमारास मालेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात मोहम्मद अथर खुर्शीद अहमद या डॉक्टरने तेथे परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन हिंदू आदिवासी युवतीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेबाबत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
तरी देखील सदर खटला जलद न्यायालयात चालवण्यात येऊन आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत महिलांनी झालेल्या घटनेबद्दल बैठकीत संताप व्यक्त केला. सदर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सर्व राजकीय पक्षाचे आणि सामाजिक संघटनेचे महिला प्रतिनिधी एकत्र येऊन सदरहू घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी दिनांक 21 जुलै 2025, सोमवार रोजी दुपारी 02.00 वा. गांधी पुतळा, मोसम पूल या ठिकाणाहून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नारीशक्ती मोर्चा काढून आपल्या भावना प्रशासनासमोर व्यक्त करण्याचा बैठकीत ठराव करण्यात आला व सदर नारीशक्ती मोर्चामध्ये मालेगाव शहरातील अन्य महिलांनी सहभागी होऊन आपला भावना मांडण्यासाठी उपस्थित रहावे.

Comments